Coronavirus Impact : IPL मॅचपासून ते शाळेपर्यंत, ठाकरे सरकारने घेतले ‘हे’ 11 महत्त्वाचे निर्णय

मुंबई : पोलीसनामा ऑनलाइन – कोरोना व्हायरसमुळे होणारा Covid-19 हा आजार जागतिक साथीचा रोग असल्याचे जागतिक आरोग्य संघटनेनं जाहीर केलं. त्यापाठोपाठ भारताने व्हिसा बंदी करून प्रसार रोखण्याचा प्रयत्न सुरु केला आहे. महाराष्ट्रात कोरोनाच्या रुग्णांमध्ये वाढ झाली आहे. याची दखल घेत ठाकरे सरकारने काही महत्त्वपूर्ण निर्णय घेतल्याचे आरोग्यमंत्री राजेश टोपे यांनी आज (गुरुवारी) जाहीर केले.

ठाकरे सरकारने घेतलेले 11 महत्त्वाचे निर्णय
1. सर्व शासकीय कार्यक्रम रद्द.
2. IPL तिकीट विक्री न करण्याचा निर्णय.
3. राज्यात मोठ्या प्रमाणात जनजागृती सुरु करणे.
4. शाळा बंद नाही. राज्यातील परिस्थिती पाहून शाळांसंदर्भातला निर्णय.
5. गर्दी टाळण्याचे आदेश.
6. कोरोनाच्या सरसकट चाचणीचा आग्रह टाळावा. रुग्णाच्या आजाराचा इतिहास पाहूनच निर्णय घ्यावा.
7. पर्यटकांना बाहेर घेऊन न जाण्याचे पर्यटन कंपन्यांना आदेश.
8. जे सध्या बाहेर आहेत त्यांची यादी जिल्हाधिकाऱ्यांना द्यावी.
9. एन -95 मास्कची फक्त डॉक्टर्स आणि स्टाफला गरज.
10. सॅनिटायझरबाबत आग्रह धरू नये.
11. साबणाचा जास्तीत जास्त वापर करा.

राज्यातील रुग्णांची प्रकृती स्थिर
महाराष्ट्रात पुण्यात कोरोनाचे सर्वाधिक म्हणजे एकूण 9 रुग्ण असून त्यांच्यावर उपचार सुरु आहेत. या रुग्णांची प्रकृती स्थिर असल्याची माहिती आयुक्त डॉ. दीपक म्हैसकर आणि जिल्हाधिकारी नवल किशोर राम यांनी दिली. 1 मार्च रोजी एक व्यक्ती अमेरिकेहून पुण्यात परतला होता. त्याची तपासणी 11 मार्च रोजी करण्यात आली होती ती पॉझिटिव्ह आली आहे.