Coronavirus : राज्यात ‘कोरोना’चे 2361 नवे रुग्ण तर 76 जणांचा मृत्यू, बधितांचा आकडा 70 हजार ‘पार’

मुंबई : पोलीसनामा ऑनलाइन –   राज्यात गेल्या 24 तासात कोरोनाचे 2361 नवे रुग्ण आढळून आले आहेत. त्यामुळे महाराष्ट्रात रुग्णांची संख्या 70 हजार 13 इतकी झाली आहे. तर 76 जणांचा मृत्यू झाला आहे. राज्यात 24 तासात 779 रुग्ण कोरोनामुक्त झाले आहेत. आतापर्यंत 30 हजार 108 रुग्ण बरे होऊन घरी गेले आहेत. राज्यात सध्याच्या घडीला 37 हजार 534 रुग्ण अॅक्टिव्ह आहेत, अशी माहिती राज्याचे आरोग्यमंत्री राजेश टोपे यांनी दिली.

राज्यात मृत्यू झालेल्या 76 रुग्णांमध्ये 45 पुरुष आणि 31 महिला रुग्णांचा समावेश आहे. 76 पैकी 37 रुग्णांचे वय 60 वर्षापेक्षा अधिक आहे. तर 36 रुग्णांचे वय 40 ते 59 इतके होते. तीन रुग्णांचे वय 40 वर्षापेक्षा कमी होते. आज ज्या 76 रुग्णांचा मृत्यू झाला आहे त्यापैकी 51 जणांना मधुमेह, उच्च रक्तदाब, हृदविकार हे गंभीर स्वरुपाचे आजार होते.

आज नोंदविण्यात आलेल्या 76 मृत्यूपैकी 54 मृत्यू गेल्या दोन दिवसांमधील आहेत. इतर 22 मृत्यूपैकी मुंबईत 9, नवी मुंबई 5, औरंगाबाद 3, रायगड 2, बीड 1, मीरा भाईंदर 1, ठाण्यातील एका रुग्णाचा समावेश आहे. 4 लाख 71 हजार 573 रुग्णांच्या चाचण्यापैकी 70 हजार 13 जणाचे अहवाल पॉझिटिव्ह आले आहेत.

पोलीसनामा न्युज आता टेलीग्रामवर... आमचं चॅनेल (@policenamanews) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.
WhatsAPP
You might also like