Coronavirus in Nagpur : नागपूरमध्ये कोरोनामुळं रेकॉर्ड 62 जणांचा मृत्यू, गेल्या 24 तासात 4110 नवे पॉझिटिव्ह

नागपुर : पोलीसनामा ऑनलाइन – नागपुरमध्ये कोरोनाने मृत्यूचा नवा विक्रम केला आहे. मागील 24 तासात 62 लोकांचा मृत्यू कोरोना संसर्गामुळे झाला आहे. या सीझनमध्ये कोरोनामुळे होणार्‍या मृत्यूंच्या प्रकरणात हा सर्वात मोठा आकडा आहे. तर मागील 24 तासात कोरोनाची 4110 नवी प्रकरणे समोर आली आहेत. कोरोना व्हायरसची दुसरी लाट दररोज नवीन विक्रम करत आहे.

संसर्ग वेगाने वाढत असताना बेंगळुरु येथील इंडियन इन्स्टिट्यूट ऑफ सायन्स (आयआयएससी) च्या अंदाजात म्हटले आहे की, जर कोरोना सध्याचा ट्रेंड जारी राहिला तर मेच्या अखेरपर्यंत कोरोना केसेसची संख्या 1.4 कोटीची संख्या ओलांडू शकते आणि यावेळी अ‍ॅक्टिव्ह केस लोड सुमारे 3.2 लाख असेल.

संशोधकांचे म्हणणे आहे की, एप्रिलच्या मध्याचा काळ संसर्गाचा पीक असू शकतो, जेव्हा अ‍ॅक्टिव्ह केस 7.3 लाखापर्यंत जाऊ शकतात. या रिसर्चनुसार, वाईट स्थितीत मेच्या अखेरपर्यंत अ‍ॅक्टिव्ह केसची संख्या 20 लाखापर्यंत पोहचू शकते. मात्र, जर लोकांना लस दिली गेली आणि कोरोना नियमांचे पालन झाले तर यास रोखता येऊ शकते.

महाराष्ट्र कॅबिनेटने राज्यात कोरोना वाढत असल्याने कठोर मार्गदर्शक तत्व लागू करण्याचा निर्णय घेतला आहे. हे सर्व निर्देश सोमवारी सायंकाळी 8 वाजल्यापासून लागू होतील. कॅबिनेटने निर्णय घेतला आहे की, आवश्यक सेवांमध्ये कार्यरत लोकांनाच रात्री बाहेर पडण्याची परवानगी असेल.