Maharashtra Crime | थायलंडला नोकरीला जाताना सावधान ! ठाण्याच्या तरुणाचे खंडणीसाठी अपहरण, अमेरिकन नागरिकांची फसवणुक करण्याची केली जाते सक्ती

ठाणे : Maharashtra Crime | चांगल्या पगाराच्या नोकरीच्या आमिषाने अनेक तरुण परदेशात जातात. अशाच प्रकारे ठाण्यातील वागळे इस्टेट (Wagle Estate) भागात राहणारा आशिष दुबे (Ashish Dubey) हा उच्च शिक्षित तरुण थायलंडला (Thailand) गेला. परंतु, तेथे त्याच्या बुद्धिमत्तेचा वापर करुन घेण्यासाठी त्याच्यावर अमेरिकन नागरिकांची फसवणुक (Fraud Case) करण्याची सक्ती केली जात आहे. त्याचे अपहरण (Kidnapping Case) करण्यात आले असून त्याच्याकडे ३ हजार डॉलरची खंडणी (Ransom) मागण्यात आली आहे. (Maharashtra Crime)

याप्रकरणी आशिषच्या पालकांनी पंतप्रधान नरेंद्र मोदी (PM Narendra Modi) आणि मुख्यमंत्री एकनाथ शिंदे (CM Eknath Shinde) यांच्याकडे थायलंडच्या दूतावासाशी बोलून आशिषची सुटका करण्याची मागणी केली आहे. याबाबत ठाण्यातील श्रीनगर पोलीस ठाण्यात (Srinagar Police Station) गुन्हा (FIR) दाखल करण्यात आला असून ठाणे खंडणीविरोधी पथकाने दोघांना चौकशीसाठी ताब्यात घेतले आहे.

याबाबत आशिषचा भाऊ अविनाश दुबे (Avinash Dubey) यांनी दिलेल्या माहितीनुसार, आशिष हा एका मित्राच्या ओळखीतून २० सप्टेबरला थायलंडमध्ये डिजिटल मार्केटिंग (Digital Marketing) या फिल्डमध्ये नोकरीसाठी गेला होता. तिथे गेल्यानंतर मात्र त्याला वेगळाच प्रकार अनुभवायला आला. त्याला जंगलातून नदी ओलांडून एका अज्ञात ठिकाणी नेण्यात आले. तेथे भारतातील १३ तरुणांना ठेवण्यात आले होते. (Maharashtra Crime)

सुरुवातीला त्यांना क्रिप्टोकरन्सी क्षेत्रात ट्रेनिंग दिल्यानंतर मुलीच्या नावाने बनावट ई-मेल आय डी (Fake E-mail ID) तयार करुन अमेरिकन नागरिकांना क्रिप्टो करन्सी (Crypto Currency) विकण्याच्या बहाण्याने त्यांच्या बँक खात्यांची माहिती घेऊन त्यांची फसवणुक (Cheating Case) करण्याचे काम आशिषला सांगण्यात आले. त्याने व अन्य काही तरुणांनी हे काम करण्यास नकार दिला. तेव्हा त्यांना धमकाविण्यात आले. आशिषसह अन्य काही तरुणांनी राजीनामा दिल्यानंतर त्यांना ५० थायबाथ तिकीट खर्च आणि ३ हजार डॉलर, अन्य शुल्काच्या नावाखाली साडेचार लाखांच्या खंडणीची मागणी करण्यात आली. ती दिली तरच आशिषला सोडण्यात येईल असे धमकाविले.

दिवसातून एकच वेळ शिळे जेवण
आशिष व तरुणांचे तेथे खूप हाल होत आहेत. त्यांना दिवसातून केवळ एकदाच तेही शिळे जेवण दिले जाते.
त्यांच्याकडून १८ तास काम करवून घेतले जाते.
चायनीज लोकांच्या सुरक्षिततेमध्ये त्यांना ठेवण्यात येते, अशी माहिती त्याने फोन करुन कुटुंबियांना दिली.
हे सर्व त्यांच्या कुटुंबियांनी भारतीय व थायलंडच्या दूतावासाला कळविली.
परंतु, तिकडून कोणताही प्रतिसाद आला मिळाला नाही.

आशिषबरोबर असलेल्या अन्य एका मुलाने ५ लाखांची रक्कम थायलंडच्या या टोळीला दिली पंरतु,
तरीही त्याला न सोडल्याने हे सर्व जण हादरले आहेत.

याप्रकरणी ठाण्यात फसवणुकीचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे. ज्यांच्या मध्यस्थीने आशिष थायलंडमध्ये गेला, त्यांची चौकशी करण्यात येत आहे.

Web Title :- Maharashtra Crime | Be careful when going to work in Thailand! A youth from Thane is kidnapped for ransom, forced to deceive American citizens

Join our WhatsApp GroupTelegramfacebook page and Twitter for every update

हे देखील वाचा