Maharashtra Crime | खळबळजनक! महिलेची छेड काढल्याप्रकरणी सहायक पोलीस आयुक्तावर FIR

औरंगाबाद : पोलीसनामा ऑनलाइन – Maharashtra Crime | औरंगाबाद शहर पोलीस (Aurangabad City Police) दलातील सहायक पोलीस आयुक्त यांच्यावर (ACP – Assistant Commissioner of Police) शहरातील सिटी चौक पोलीस ठाण्यात (City Chowk Police Station) गुन्हा (FIR) दाखल करण्यात आला आहे. नाईट ड्युटीवर असताना पोलीस अधिकाऱ्याने रात्री दोनच्या सुमारास एका घरात घुसून महिलेची छेड काढल्याचा (Aurangabad Crime News) प्रकार समोर आला आहे. विशाल ढुमे (ACP Vishal Dhume) असे गुन्हा (Maharashtra Crime) दाखल करण्यात आलेल्या सहायक पोलीस आयुक्ताचे नाव आहे. या घटनेमुळे औरंगाबाद पोलीस दलात खळबळ उडाली आहे.

 

मिळालेल्या माहितीनुसार, सहायक पोलीस आयुक्त विशाल ढुमे रात्री एका हॉटेलमध्ये दारु पिण्यासाठी गेले होते. त्यावेळी त्यांचा मित्र आपल्या पत्नीसोबत त्याठिकाणी आले होते. तिथे दोघांची भेट झाली. ढुमे यांनी आपल्याकडे गाडी नसल्याचे सांगून मित्राकडे लिफ्ट मिळेल का? असे मित्राला विचारले. त्यावेळी मित्राने होकार देत त्यांना आपल्या गाडीत बसवले. (Aurangabad Crime News)

गाडीत बसताना त्यांचा मित्र आणि त्यांची पत्नी पुढच्या सीटवर बसले होते. तर ढुमे मागील सीटवर बसले होते. दरम्यान, दारुच्या नशेत असलेल्या ढुमे यांनी महिलेची छेड काढण्यास सुरुवात केली. महिलेच्या पाठीवरुन हात फिरवायला सुरुवात केली. त्यानंतर काही अंतरावर गेल्यावर त्यांनी वॉशरुमला जायचे असून, तुमच्या घरी घेऊन चल, अशी विनंती मित्राला केली. तर घरी गेल्यानंतर तुमच्या बेडरुममधील वॉशरुम मला वापरायचे असल्याचे म्हणत वॉशरुम वापरण्याची परवानगी मागितली. मात्र, तेथेही ढुमे यांनी महिलेची छेड काढली. तसेच महिलेच्या पतीला मारहाण केली. हा प्रकार शहरातील एका उच्चभ्रू परिसरात शनिवारी मध्यरात्री घडला.

 

 

Web Title :- Maharashtra Crime | case registered against acp of aurangabad for
molesting woman maharashtra Crime news

 

Join our WhatsApp GroupTelegramfacebook page and Twitter for every update

 

हे देखील वाचा