Maharashtra Crime News | सेक्सटॉर्शन प्रकरणातील महिलेसह तथाकथित पत्रकारावर आणखी एक गुन्हा दाखल

नंदुरबार : पोलीसनामा ऑनलाइन – Maharashtra Crime News | अश्लील व्हिडिओ कॉल (Pornographic Video Calls) करुन खंडणी (Ransom) उकळणाऱ्या एक महिलेसह एका पोलीस कर्मचाऱ्याला तसेच एका तथाकथित पत्रकाराला नंदुरबार पोलिसांनी (Nandurbar Police) अटक (Arrest) केली आहे. या गुन्ह्यातील (Maharashtra Crime News) आरोपींना 7 दिवसांची पोलीस कोठडी मिळाली असून आरोपी महिलेसह तथाकथित पत्रकारावर आणखी एक गुन्हा दाखल झाला आहे.

 

पोलीस कर्मचारी छोटु तुमडु शिरसाठ Chhotu Tumdu Shirsath (वय-46) तथाकथीत पत्रकार अतुल रामकृष्ण थोरात (चौधरी) Journalist Atul Ramakrishna Thorat (वय-50) आणि अश्लील व्हिडीओ कॉल करणाऱ्या महिलेला अटक केली आहे. याबाबत शहादा पोलीस ठाण्यात (Shahada Police Station) IPC 384, 385, 389, 363, 323, 504, 506, 34 सह माहिती तंत्रज्ञान कायद्यानुसार गुन्हा दाखल केला आहे. यानंतर नंदुरबार शहर पोलीस ठाण्यात आरोपी महिलेसह तथाकथित पत्रकारावर आणखी एक गुन्हा दाखल झाला आहे.

सेक्सटॉर्शन (Sextortion) चे प्रकरण उघडकीस आल्यानंतर पोलीस अधीक्षक पी.आर पाटील यांनी नागरिकांना आवाहन केले होते. अशा प्रकारचे अश्लील व्हिडीओ करुन व बदनामी करण्याची भीती दाखवून खंडणी मागण्याचे प्रकार ज्या नागरिकांसोबत झाले असतील त्यांनी भिती न बाळगता समोर येवून पोलीस ठाण्यात तक्रार द्यावी. तसेच तक्रारदार यांचे नाव गुप्त ठेवण्याचे आश्वासन दिले होते.(Maharashtra Crime News)

 

पोलीस अधीक्षक पी. आर पाटील यांच्या आवाहनानंतर गुरुवारी (दि.2) नंदुरबार शहरातील 41 वर्षीय बांधकाम व्यावसायिकाने (Builder) नंदुरबार शहर पोलीस ठाण्यात (Nandurbar City Police Station) तक्रार दिली आहे. तक्रारदार बांधकाम व्यावसायिक यांना देखील आरोपी महिला आणि तिच्या दोन महिला साथीदार व तथाकथित पत्रकार यांनी दोन महिन्यापूर्वी छेडखानी व जातीवाचक शिवीगाळ केल्याच्या खोट्या गुन्ह्यात अडकवण्याची धमकी देऊन पाच लाख रुपये खंडणी मागितली होती. तक्रारदार यांच्या तक्रारीवरुन नंदुरबार शहर पोलीस ठाण्यात IPC385, 120(ब), 504, 506,34 नुसार गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

 

काय आहे प्रकरण?

शहादा तालुक्यातील मसावद येथील 43 वर्षाच्या नोकरदार व्यक्तीने फिर्याद दिली आहे. फिर्यादी यांना 4 एप्रिल 2022 रोजी अनोळखी महिलेने मोबाईलवरुन संपर्क केला. महिलेसोबत ओळख नसल्याने त्यांनी प्रतिसाद दिला नाही. त्यानंतर काही दिवस त्या महिलेने वारंवार फोन केले. दोघांमध्ये संवाद होऊ लागला. अचानक एक दिवस व्हिडिओ कॉलवर बोलत असताना तिने अश्लील चाळे केले. नंतर आपला हा कॉल रेकॉर्ड असल्याचे सांगत तक्रार करणार असल्याची धमकी (Threat) देण्यास सुरुवात केली. फिर्यादी हे घाबरलेले असतानाच पोलीस कर्मचारी छोटू शिरसाठ याने संपर्क केला व मध्यस्थी करीत असल्याचा बहाणा करुन प्रकरण मिटवण्यास सांगितले. महिला आणि पोलीस कर्मचारी शिरासट यांनी प्रकरण मिटवण्यासाठी 14 लाख रुपये मागून दबाव टाकला.

 

अखेर फिर्यादी यांनी 9 लाख रुपये दिले व ती क्लिप डिलिट करण्यास सांगितले. यानंतर अतुल थोरात नावाच्या तथाकथित पत्रकाराने अश्लील कॉलची क्लिप व्हायरल करण्याची धमकी देऊन पैसे मागण्यास सुरुवात केली. तो व्हिडिओ डिलीट का केला नाही अशी विचारणा पोलीस कर्मचाऱ्याकडे केली असता त्यांने उडवाउडवीची उत्तरे दिली. फिर्यादी यांनी मानसिक छळाला कंटाळून जिल्हा पोलीस अधीक्षक पी.आर. पाटील (Superintendent of Police P.R. Patil) यांच्याकडे जाऊन त्यांच्या बाबतीत घडलेला सर्व प्रकार सांगितला.

पोलीस अधीक्षक पी.आर. पाटील (SP P.R. Patil) यांनी स्थानिक गुन्हे अन्वेषणचे पोलीस निरीक्षक रवींद्र कळमकर (LCB Police Inspector Ravindra Kalmakar) यांना चौकशी करण्याचे आदेश दिले.
त्यातून सत्यता हाती येताच अपर पोलीस अधीक्षक विजय पवार (Addl SP Vijay Pawar)
यांनी शहदा पोलीस ठाण्याचे पोलीस निरीक्षक दीपक बुधवंत (Police Inspector Deepak Budhwant),
म्हसावद पोलीस ठाण्याचे (Mhaswad Police Station) सहायक पोलीस निरीक्षक संदीप पाटील (API Sandeep Patil)
यांच्या माध्यमातून गुन्हा दाखल करण्याची कारवाई केली. पोलीस कर्मचारी व तथाकथित पत्रकारासह त्या महिलेला अटक करण्यात आली.

 

ही कारवाई पोलीस अधीक्षक पी.आर पाटील, अपर पोलीस अधीक्षक विजय पवार,
उप विभागीय पोलीस अधीकारी श्रीकांत घुमरे (Sub-Divisional Police Officer Shrikant Ghumre)
यांच्या मार्गदर्शनाखाली स्थानिक गुन्हे शाखेचे पोलीस निरीक्षक रविंद्र कळमकर,
शहादा पोलीस ठाण्याचे पोलीस निरीक्षक दिपक बुधवंत, सहायक पोलीस निरीक्षक संदीप पाटील,
सहायक पोलीस निरीक्षक नयना देवरे (API Nayana Deore), शहदा पोलीस ठाण्याचे
पोलीस उपनिरीक्षक माया रजपुत (PSI Maya Rajput) पथकाने केली.

 

Web Title :- Maharashtra Crime News | Another case was registered against the
so-called journalist along with the woman in the sextortion case nandurbar police

 

Join our WhatsApp GroupTelegramfacebook page and Twitter for every update

 

हे देखील वाचा