Maharashtra Crime News | धक्कादायक ! जॉगिंगला गेलेल्या महिला उपजिल्हाधिकाऱ्यावर चाकूने हल्ला

सांगली : पोलीसनामा ऑनलाइन – Maharashtra Crime News | सांगलीतील एक धक्कादायक बातमी समोर (Sangli Crime) आली आहे. सांगलीच्या उपजिल्हाधिकाऱ्यांवर (Deputy Collector of Sangli) दोन अज्ञात व्यक्तींनी प्राणघातक हल्ला (Attack) केल्याची घटना घडली आहे. आरोपींनी चाकूने हल्ला करत उपजिल्हाधिकारी हर्षलता गेडाम (Deputy Collector Harshalata Gedam) यांना जखमी केलं आहे. पहाटेच्या सुमारास जॉगिंगला (Jogging) गेलेल्या असताना हा प्रकार घडला आहे. या घटनेमुळे शहरात खळबळ उडाली आहे. (Maharashtra Crime News)

 

हर्षलता गेडाम या सकाळी नेहमीप्रमाणे जॉगिंगसाठी विश्रामबागच्या नेमिनाथनगर येथील कल्पद्रुम क्रीडांगणावर गेल्या होत्या. जॉगिंग सुरू असताना मोटारसायकालवरून आलेल्या अज्ञात दोघांनी गेडाम यांच्या हाताला पडकला. त्यानंतर अज्ञात इसमाला गेडाम यांनी लाथ मारून खाली पाडले. या झटापटीवेळी दुसऱ्या आरोपीने गेडाम यांच्यावर चाकूने हल्ला केला. या हल्ल्यात त्यांना किरकोळ जखम झालीय. हल्ला होताच मार्शल आर्ट असणाऱ्या गेडाम यांनी स्वतःचा बचाव करण्यासाठी प्रतिहल्ला केल्यानंतर आरोपींनी पळ काढला. (Maharashtra Crime News)

 

या दरम्यान, अज्ञात आरोपींपैकी एकाने 17 मे रोजी गेडाम यांचा पाठलाग करत छेड काढण्याचा प्रयत्न केला होता. पण, त्यावेळी त्यांनी दुर्लक्ष केलं होतं. आज तिच व्यक्ती पहाटेच्या सुमारास पुन्हा आली आणि त्याने गेडाम यांच्यावर हल्ला केला. याबाबत उपजिल्हाधिकारी गेडाम यांनी विश्रामबाग पोलीस ठाण्यात (Vishrambag Police Station) तक्रार दिली. यानंतर अज्ञातांच्या विरोधात गुन्हा (FIR) दाखल करण्यात आला आहे.

 

Web Title :- Maharashtra Crime News | attack on lady deputy collector at the time of jogging morning walk in sangli shocking incident of maharashtra

 

Join our WhatsApp GroupTelegramfacebook page and Twitter for every update

 

हे देखील वाचा

 

Eknath Khadse | राजकारणात इतिहासजमा झाले म्हणणाऱ्यांना एकनाथ खडसेंचे उत्तर; म्हणाले…

 

Tata Group च्या ‘या’ स्टॉकमध्ये मिळू शकतो 41% शानदार रिटर्न; दमदार बिझनेस आऊटलुकवर BUY रेटिंग; पहा टार्गेट

 

PM Kisan e-KYC | शेतकऱ्यांसाठी महत्वाची बातमी ! PM किसानची e-KYC करण्यासाठी मुदत वाढवली; जाणून घ्या