Maharashtra Crime News | दुर्देवी! चंद्रपूरमध्ये सेल्फीच्या नादात 4 जण बुडाले, तर मालाडमध्ये 3 जण बुडाले

मुंबई : पोलीसनामा ऑनलाइन – Maharashtra Crime News | मुंबईच्या मालाडमध्ये (Mumbai Malad) आणि चंद्रपूरमध्ये (Chandrapur) दुर्देवी घटना घडल्याचे समोर आले आहे. चंद्रपूरमध्ये सेल्फीच्या नादात चार जणांचा बुडून मृत्यू (Four People Drowned) झाला आहे, तर मालाडमध्ये तीन तरुण समुद्रात बुडाले (Three Youths Drowned in The Sea) असल्याचे समोर आले आहे. या दोन्ही दुर्देवी घटनेमुळे (Maharashtra Crime News) सर्वत्र हळहळ व्यक्त होत आहे. पावसाळ्याचा आनंद लुटण्यासाठी जे पर्यटनासाठी जातात त्यांनी काळजी घेण्याचे आवाहन देखील वेळोवेळी प्रशासनाकडून करण्यात येत आहे.

चंद्रपूरमध्ये सेल्फी काढण्याच्या नादात 4 युवकांचा बुडून मृत्यू (Death) झाला. नागभीड तालुक्यातल्या घोडाझरी सिंचन तलाव येथे घटना (Maharashtra Crime News) घडली. वरोरा तालुक्यातील शेगाव येथील 8 युवक पावसाळा सुरु झाल्यामुळे सहलीसाठी गेले होते. यातील एक युवक सेल्फी काढण्याच्या नादात तलावात घसरला, त्याला वाचविण्याच्या नादात पाण्यात उतरलेल्या इतर 3 युवक ही बुडाले. दरम्यान स्थानिक पोलीस (Local Police) आणि आपत्ती निवारण पथकाने (Disaster Response Team) तातडीने घटनास्थळी धाव घेतली. सध्या स्थानिक मासेमारांच्या मदतीने शोधकार्य सुरू आहे.

मालाड मार्वे बीचवर (Malad Marve Beach) तीन मुलांचा बुडून मृत्यू झाला. रविवारी सकाळी मालवणी मधून समुद्रात पोहायला गेलेले पाच पैकी तीन मुले बुडाली. मालवणी परिसरांमधून पाच लहान मुलांचे ग्रुप मालाड मार्वे बीचवर समुद्रात पोहायला आले होते. यातील पाचही मुले समुद्रात पोहायला गेले असता, तीन मुले समुद्रात बुडून गेली तर दोन मुले सुखरूप बाहेर आले. शुभम राजकुमार जयस्वाल (Shubham Rajkumar Jaiswal) (वय 12), निखिल साजिद कायमकुर (Nikhil Sajid Kayamkur) (वय 13), अजय जितेंद्र हरिजन (Ajay Jitendra Harijan) (वय 12) असे समुद्रात बुडालेल्या मुलांची नावे आहेत.

या दुर्देवी घटनेची माहिती मिळताच मालवणी पोलीस (Police), मुंबई अग्निशमन दलाचे जवान (Mumbai Fire Brigade),
मुंबई महापालिका लाईफ गार्ड (Life Guards) आणि कोस्ट गार्डच्या (Coast Guard) हेलिकॉप्टरच्या माध्यमातून तब्बल पाच
तासापासून समुद्रात शोध मोहीम (Search Expedition) केली जात आहे. कोस्टगार्डचा हेलिकॉप्टर च्या माध्यमातून मुलांचा समुद्रात शोध मोहीम सुरू आहे.

Web Title : Maharashtra Crime News | chandrapur 4 dead mumbai three dead drown monsoon picnic

Join our WhatsApp GroupTelegramfacebook page and Twitter for every update

हे देखील वाचा

Rahul Kalate | ठाकरेंना पुन्हा धक्का; राहुल कलाटे शिवसेनेत (शिंदे गट) प्रवेश करणार

Threat Call To Gadkari | नितीन गडकरींना धमकी देणारा अफसर पाशाला 5 दिवसाची पोलीस कोठडी

Weather Forecast IMD Alert | देशात आठवडाभर पावसाचा जोर कायम; महाराष्ट्रातही 5 दिवस मुसळधार, हवामान खात्याकडून ‘अलर्ट’