Maharashtra Crime News | ब्लॅकमेल करून 18 वर्षीय तरूणीवर अत्याचार, इमारतीवरून उडी मारून दिला जीव, 7 जणांना अटक

कल्याण : पोलीसनामा ऑनलाइन – Maharashtra Crime News | कल्याण शहरातील पूर्व विभागात एक अतिशय खळबळजनक घटना घडली आहे (Kalyan Crime). मृत मुलीचे एका मुलासोबत अफेअर असल्याचे समजल्यानंतर 7 जणांनी तिला ब्लॅकमेल करण्यास सुरूवात केली, नंतर तिच्यावर लैंगिक अत्याचार करून व्हिडिओ तयार केले. या ब्लॅकमेलला (Blackmail) कंटाळून अखेर या 18 वर्षीय तरूणीने इमारतीच्या तिसर्‍या मजल्यावरून उडी मारून आत्महत्या केली. या प्रकरणी कोळसेवाडी पोलिसांनी 7 जणांना अटक केली आहे. तसेच एका तरुणीचा शोध पोलीस घेत आहे. (Maharashtra Crime News)

 

तरुणीच्या आत्महत्येचा तपास करत असतना पोलिसांनी तिचा मोबाईल तपासला असता नोटपॅडमध्ये काही मजकूर नोंदवून ठेवण्यात आल्या होत्या. मृत मुलीचे एका तरूणासोबत अफेअर होते, हे समजताच काही तरूणांनी तिला ब्लॅकमेल करण्यास सुरूवात केली. तिच्यावर लैगिंक अत्याचार करुन तिचा व्हीडीओ बनवले. नंतर हे व्हायरल करण्याची धमकी तिला देण्यात आली. (Maharashtra Crime News)

 

तरूणीच्या मोबाईलमधून मिळालेल्या माहितीच्या आधारे पोलिसांनी 7 जणांना अटक केली आहे. अटक करण्यात आलेल्या आरोपींची नावे विजय यादव, प्रमय तिवारी, सनी पांडे, शिवम पांडे, कृष्णा जयस्वाल, आनंद पांडे, निखिल मिश्रा अशी आहे. या प्रकरणात काजल जयस्वाल या तरुणीचा पोलिस शोध घेत आहेत.

मृत तरुणी महाविद्यालयात शिकत होती. 12 वीला तिला 71 टक्के गुण मिळाले होते. तिला पदवीच्या पहिल्या वर्गात प्रवेश घ्यायचा होता.
तिचे वडील मुंबईत सुरक्षा रक्षकाचे काम करतात. तिची आई गृहिणी आहे. दोन लहान भाऊ आहेत.
आरोपी हे धनाढ्य कुटुंबातील असून त्यांच्याकडून आमच्यावर दबाव टाकला जात आहे. पोलिसांनी आम्हाला संरक्षण द्यावे.
आरोपींना कठोर शिक्षा झाली पाहिजे, अशी मागणी पीडित तरुणीच्या आई – वडिलांनी केली आहे.

 

दरम्यान, आरोपींविरूद्ध लैंगिक अत्याचाराचे कलम लावावे, अन्यथा आंदोलन करण्यात येईल,
असा इशारा शिवसेना महिला आघाडीच्या पदाधिकारी आशा रसाळ यांनी दिला आहे.

 

Advt.

Web Title :- Maharashtra Crime News | fed up with sexual harassment the young girl ended her life by jumping from the third floor of the building seven arrested in this case

 

Join our WhatsApp Group, Telegram, facebook page and Twitter for every update

 

हे देखील वाचा