Maharashtra Crime News | धक्कादायक! जेलचे गज कापून संगमनेरच्या कारागृहातून चार कैद्यांचे ‘फिल्मी स्टाईल’नं पलायन

संगमनेर : पोलीसनामा ऑनलाइन – Maharashtra Crime News | संगमनेर शहर कारागृहाचे (Sangamner City Jail) गज कापून बलात्कार (Rape Case) आणि खून (Murder Case) प्रकरणातील चार आरोपी पसार झाले आहेत. ही घटना बुधवारी (दि.5) पहाटे पाच वाजण्याच्या सुमारास घडली आहे. अत्याचार प्रकरणातील रोशन थापा ददेल, अनिल ढोले, खुन प्रकरणातील देविदास काळे आणि मच्छिंद्र जाधव अशी पसार झालेल्या आरोपींची नावे आहे. (Maharashtra Crime News)

संगमनेर शहर पोलीस ठाण्याच्या (Sangamner City Police Station) कारागृहात सध्या अनेक कैदी शिक्षा भोगत आहेत. मंगळवारी (दि.7) रात्री नेहमीप्रमाणे तीन पोलीस कर्मचारी बंदोबस्तासाठी होते. हे कर्मचारी बंदोबस्तात असतानाही कैदी जेलचे गज कापून पळून गेले. आरोपींनी नियोजनबद्ध पद्धतीने जेलमधून पलायन केले.

मिळालेल्या माहितीनुसार, बंदोबस्तावरील पोलिसांचे दुर्लक्ष व्हावं यासाठी जेलमध्ये मोठ मोठ्यानं गाणे आणि आरत्या सुरु होत्या. या गोंधळात चौघांनी जेलचे गज तोडले. ठरल्याप्रमाणे बाहेर एक कार आधीच येऊन थांबली होती. जेल तोडून कैदी या कारमधून पसार झाले. कारागृहातून कैदी पळाल्याने कारागृहात खळबळ उडाली आहे. (Maharashtra Crime News)

पळून गेलेल्या चौघांचा पोलिसांनी शोध सुरू केला आहे. संगमनेर उपविभागाचे उपविभागीय पोलीस अधिकारी
सोमनाथ वाघचौरे, शहर पोलीस ठाण्याचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक भगवान मथुरे यांच्या मार्गदर्शनाखाली पळून गेलेल्या आरोपींचा शोध सुरू आहे.

Join our WhatsApp GroupTelegramfacebook page and Twitter for every update

हे देखील वाचा

Pune ACB Trap Case News | 5 हजाराच्या लाच प्रकरणी पुरंदर तालुक्यातील तलाठी अन् पंटर अ‍ॅन्टी करप्शनच्या जाळ्यात

Pune Crime News | आई व मुलीला जातीवाचक शिवीगाळ करुन मारहाण, खडकीतील प्रकार; एकाला अटक

Ananya Panday Airport Look | अनन्या पांडेच्या कॅज्युअल एअरपोर्ट लूकनं चाहत्यांच वेधलं हृदय…!