Maharashtra Crime News | धक्कादायक ! मुलानेच जन्मदात्या वडिलांवर कोयत्याने सपासप वार करून केला खून; परिसरात खळबळ

बीड : पोलीसनामा ऑनलाइन – Maharashtra Crime News | दारूच्या नशेत असलेल्या एका मुलानेच आपल्या जन्मदात्या बापाचा खून (Murder) केला आहे. हातातील कोयत्याने सपासप वार करून या मुलाने वडीलांचा खून केला आहे. ही घटना बीडच्या (Beed Crime) केज तालुक्यातील जवळबन गावात घडली. शिवाजी केशव हंकारे (Shivaji Keshav Hankare) (वय 55, रा. जवळबन, ता. केज) असे मृताचे नाव असून पवन शिवाजी हंकारे (Pawan Shivaji Hankare) (वय, 26) असे आरोपी मुलाचे नाव आहे. या घटनेमुळे परिसरात खळबळ उडाली आहे. (Maharashtra Crime News)

 

याबाबत माहिती अशी की, 14 जून रोजी शिवाजी आणि पवन या दोन्ही पिता-पुत्राने गावातील दक्षिणेला असलेल्या माळावर जाऊन एकत्रित दारू पिली. त्यांनतर पवन याने वडील शिवाजी यांना, तुम्ही दारू पिऊन आईला त्रास का देता ? असा जाब विचारल्याने दोघांत वाद झाला. तोच वाद अगदी टोकाला गेला. दोघात हाणामारी सुरु झाली. पवन याने दारूच्या नशेत असलेल्या वडील शिवाजी यांना अगोदर हाताने मारहाण केली. त्यानंतर हातातील कोयत्याने हातावर व पायावर सपासप वार केले. या हल्ल्यात शिवाजी हंकारे गंभीर जखमी (Seriously injured) झाले आणि त्यांचा जागीच मृत्यू (Died) झाला. (Maharashtra Crime News)

दरम्यान, वडिलांचा मृत्यू झाल्याचे समजताच पवन घाबरला. त्यामुळे त्याने मृतदेह सोयाबीनच्या भुसकटात झाकून ठेवला.
पण, 15 जून रोजी भीतीपोटी तो स्वत:हून युसूफ वडगाव पोलिस ठाण्यात (Yusuf Wadgaon Police Station) हजर झाला.
आपणच आपल्या वडिलाची हत्या केली असून मृतदेह सोयाबीनच्या भुसकटात झाकून ठेवला असल्याची कबुली दिली. त्यानंतर पोलिसांनी पवनला ताब्यात घेतले आहे.

 

Web Title :- Maharashtra Crime News | son murdered the father beed crime maharashtra

 

Advt.

Join our WhatsApp Group, Telegram, facebook page and Twitter for every update

 

हे देखील वाचा