Maharashtra Crime News | खळबळजनक! पोलीस पत्नीसह दीड वर्षाच्या चिमुकलीची हत्या करुन पतीनेही संपवले जीवन

बुलढाणा : पोलीसनामा ऑनलाइन – Maharashtra Crime News | नागपंचमीच्या दिवशी (Nagpanchami) बुलढाणा जिल्हा हादरुन गेला आहे. पोलीस दलात (Buldhana Police) कार्यरत असणाऱ्या पत्नी व पोटच्या दीड वर्षाच्या चिमुकलीवर धारदार शस्त्राने वार करुन खून (Murder) केल्यानंतर पतीने देखील गळफास (Hanging) घेऊन आत्महत्या केली (Committed Suicide). ही घटना (Maharashtra Crime News) सोमवारी (दि.21) दुपारी दीडच्या सुमारास बुलढाणा जिल्ह्यातील चिखली शहरातील पंचमुखी महादेव मंदिर परीसरात घडली.

वर्षा किशोर कुटे (Varsha Kishore Kutte), दीड वर्षांची मुलगी कृष्णा किशोर कुटे (Krishna Kishore Kute) आणि किशोर कुटे (Kishore Kute) अशी मृतांची नावे आहेत. या हत्याकांडाचे कारण अद्याप समोर आलेले नाही. या प्रकरणाने परिसरात हळहळ व्यक्त केली जात आहे. (Maharashtra Crime News)

वर्षा कुटे ह्या चिखली पोलीस ठाण्यात (Chikhli Police Station) कार्यरत होत्या. तर त्यांचे पती किशोर कुटे हे शेती करत होते. या दाम्पत्याला एक आठ वर्षाची आणि दीड वर्षाची अश्या दोन मुली होत्या. सोमवारी वर्षा ह्या ड्युटीवरुन दुपारी घरी परतल्या. त्यानंतर त्यांचे पती किशोर कुटे यांनी कांदा कापण्याच्या धारदार शस्त्राने वर्षा यांची गळा चिरुन हत्या केली. तसेच अवघ्या दीड वर्षाच्या चिमुकलीचा देखील गळा चिरुन हत्या केली. पत्नी आणि मुलीला संपवल्यानंतर किशोर यांनी शहरापासून जवळच असलेल्या गांगलगाव शिवारात गळफास घेऊन आत्महत्या केली.

या घटनेची माहिती मिळताच पोलीस पथक घटनास्थळी दाखल झाले व तिन्ही मृतदेह शवविच्छेदनासाठी
सरकारी रुग्णालयात नेण्यात आले. नागपंचमीच्या दिवशी झालेल्या या दुर्देवी घटनेने सर्वत्र हळहळ व्यक्त होत आहे.

सुदैवाने 8 वर्षाची मुलगी वाचली

या घटनेतील मृतक पती-पत्नीला दोन मुली होत्या. त्यापैकी आठ वर्षाची चिमुकली शाळेत गेली होती.
सुदैवाने नेमक्या त्याच वेळी ही घटना घडली. अवघ्या दीड वर्षाच्या मुलीच्या जीवाची पर्वा न करता तिच्या जन्मदात्या
बापाने तिला संपवले.

Join our WhatsApp GroupTelegramfacebook page and Twitter for every update

हे देखील वाचा

Tomato Price Update | नेपाळचे टोमॅटो आल्याने खाली आला भाव, किरकोळ बाजारात इतके रुपये किलो झाली किंमत