Maharashtra Crime | सासरच्या जाचाला कंटाळून विवाहितेची 6 व्या मजल्यावरुन उडी मारुन आत्महत्या, प्रचंड खळबळ

औरंगाबाद : पोलीसनामा ऑनलाइन – Maharashtra Crime | सुखी संसाराची स्वप्न उराशी बाळगून सासरी आलेल्या विवाहितेने (Married Woman Suicide In Aurangabad) अवघ्या चार महिन्यात सासरच्या जाचाला कंटाळून (Harassment) आत्महत्या केल्याची धक्कादायक घटना घडली आहे. अश्विनी कुणाल देहाडे Ashwini Kunal Dehade (वय-19 रा. वाल्मी नाका, कांचनवाडी) असे आत्महत्या केलेल्या महिलेचे नाव आहे. अश्विनी देहाडे हिने सहाव्या मजल्यावरुन उडी मारुन (Jump) आत्महत्या केली. ती दोन महिन्यांची गरोदर (Pregnant) होती. ही घटना मंगळवारी (दि.7) दुपारी (Aurangabad Crime) घडली. (Maharashtra Crime)

 

मिळालेल्या माहितीनुसार, औरंगाबाद तालुक्यातील पांढरी पिंपळगाव येथील माहेर असलेल्या अश्विनीचे वडील मेस्त्री काम करतता. अश्वीनीच्या लग्नासाठी स्थळ शोधत असताना कुणालचे स्थळ आले. एकुलता एक मुलगा असल्याने आणि वाळूज एमआयडीसी (Waluj MIDC) भागात लहान कंपनी चालवत असल्याने अश्विनीच्या वडिलांनी तिचा विवाह कुणाल सोबत करण्याचे ठरवले. फेब्रुवारी महिन्यात अश्विनी आणि कुणाल यांचे लग्न झाले. (Maharashtra Crime)

दोघांचा सुखी संसार सुरु झाला असताना सोमवारी रात्री दोघांमध्ये वाद झाले. त्यावेळी रागाच्या भरात कुणालने अश्विनीचा गळा दाबला.
घाबरलेल्या अश्निनीने आई-वडिलांना हा प्रकार सांगितला. त्यामुळे अश्विनीचे आई-वडील, लहान भाऊ आणि चुलती हे मंगळवारी सकाळी कांचनवाडी येथे आले.
सासरच्यांनी अश्विनीच्या अनेक तक्रारी केल्या. आई-वडिलांनी मुलीला समजावून सांगितले.
मात्र तडजोड काही होत नव्हती. त्यामुळे आई-वडिलांनी मुलीला माहेरी घेऊन जाण्याचा निर्णय घेतला.
तिला बँग भरण्यास सांगितले. अश्विनी बॅग भरण्यासाठी बेडरुममध्ये गेली. तिने आतून दरवाजा लावून घेतला आणि रागाच्या भरात सहाव्या मजल्यावरुन उडी मारली.
यामध्ये गंभीर जखमी झालेल्या अश्विनीला तातडीने खासगी रुग्णालयात दाखल करण्यात आले. मात्र, उपचारादरम्यान तिचा मृत्यू झाला.

 

Web Title :-  Maharashtra Crime | suicide of a married woman after getting fed up with her father in laws harassment in aurangabad crime news

 

Join our WhatsApp GroupTelegramfacebook page and Twitter for every update

 

हे देखील वाचा

 

Pune Crime | कोंढव्यात गुंडांचा धुडगूस ! पार्क केलेल्या कार, दुचाकी, रिक्षांचा काचा फोडून माजवली दहशत

 

Maharashtra Legislative Council Elections 2022 | विधान परिषदेसाठी पंकजा मुंडेंचा पत्ता कट ! भाजपकडून 5 उमेदवारांची यादी जाहीर

 

HSC 12th Result 2022 | बारावीचा निकाल जाहीर ! यंदाही कोकण विभागानं मारली बाजी; 94.22 टक्के विद्यार्थी उत्तीर्ण