राज्यात उद्यापासून पुढचे 15 दिवस कडक निर्बंध; जाणून घ्या काय सुरूआणि काय बंद ?

मुंबई : पोलीसनामा ऑनलाइन – कोरोनाचा प्रादुर्भाव रोखण्यासाठी राज्य सरकारने लॉकडाऊन लावण्याची जोरदार तयारी सुरु केली होती. त्यासाठी सोमवारी दिवसभर बैठका घेण्यात आल्या. त्यानंतर अखेर आज मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी राज्यात लॉकडाऊन मी म्हणणार नाही, पण कडक निर्बंध म्हणत नियमावलींची घोषणा केली आहे. त्यामुळे, गेल्या चार दिवसांपासून सुरु असलेल्या लॉकडाऊनच्या चर्चेला पूर्णविराम मिळाला आहे. राज्यात उद्या 14 एप्रिल रोजी रात्री 8 पासून कडक निर्बंध लागू करण्यात आले आहेत, हे निर्बंध 1 मे पर्यंत लागू राहणार आहेत. या कालावधीत काय सरु राहणार आणि काय बंद राहणार जाणून घ्या.

ब्रेक द चैन !  काय आहेत निर्बंध ?
 उद्या संध्याकाळी (14 एप्रिल) 8 वाजल्यापासून निर्बंध लागणार आहेत.
मंगळवेढा-पंढरपूरमध्ये मतदान झाल्यावर निर्बंध लागतील
उद्या संध्याकाळपासून राज्यात 144 कलम चालू
पुढचे 15 दिवस संचारबंदी
अनावश्यक बाहेर फिरणं टाळणे
घराबाहेर विनाकारण बाहेर पडू नका
आवश्यक सेवा वगळून इतर सेवा बंद राहतील
सकाळी 7 ते रात्री 8 अत्यावश्यक सेवा सुरु राहतील
लोकल, बस अत्यावश्यक कर्मचाऱ्यांसाठी सुरु राहील
जनावराचे रुग्णालय सुरु राहील
पावसाळी पूर्व कामं सर्व सुरू राहतील
अधिस्विकृती पत्रकारांना मुभा राहील
हॉटेल्स-रेस्टॉरंट (टेक अवे सुरुच राहील, पार्सल)
रस्त्यावरच्या ठेलेवाल्यांनाही टेक अवेची घोषणा
10 रुपयांची शिवभोजन थाळी 5 रुपयांना मिळणार