Maharashtra Daura | मुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांचा शनिवारपासून एकत्रित संपूर्ण महाराष्ट्राचा दौरा, ठाकरे गटाचे बालेकिल्ले निशाण्यावर

मुंबई : पोलीसनामा ऑनलाइन – मागील काही दिवसांपासून चर्चेत असलेल्या राज्य मंत्रिमंडळाचा विस्तार (Maharashtra Cabinet Expansion) आता लवकरच होणार असल्याची माहिती उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस (Devendra Fadnavis) यांनी दिली. राज्य मंत्रिमंडळाचा विस्तार झाल्यानंतर मुख्यमंत्री एकनाथ शिंदे (CM Eknath Shinde) आणि उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस संपूर्ण महाराष्ट्राचा दौरा (Maharashtra Daura) करणार असल्याची माहिती सूत्रांनी दिली आहे. सरकार स्थापन झाल्यानंतर मुख्यमंत्री आणि उपमुख्यमंत्र्यांचा संपूर्ण महाराष्ट्राचा पहिलाच दौरा (Maharashtra Daura) असणार आहे. या दौऱ्याला विशेष महत्व असणार आहे कारण लवकरच महापालिकेच्या निवडणुका (Municipal Corporation Election) होणार आहेत.

राज्यात अतिवृष्टीमुळे (Heavy Rain) झालेलं नुकसानीच्या पार्श्वभूमीवर उद्धव ठाकरे (Uddhav Thackeray) हे राज्याचा दौरा करणार आहेत. त्यांचा दौरा जाहीर झाल्यानंतर शिंदे-फडणवीस यांनी एकत्रित महाराष्ट्र दौरा आयोजित केला आहे. महत्त्वाचे म्हणजे उद्धव ठाकरेंच्या दौऱ्यापूर्वी शिंदे-फडणवीसांच्या दौऱ्याला (Maharashtra Daura) सुरुवात होणार आहे. शनिवारपासून नंदुरबार मधून महाराष्ट्र दौऱ्याला सुरुवात होण्याची शक्यता आहे.

काही दिवसांपूर्वी उद्धव ठाकरे मराठवाड्यात शेतकऱ्यांच्या भेटीला गेले होते. उद्धव ठाकरे यांच्या या दौऱ्यामुळे शिंदे-फडणवीस सरकारवर (Shinde-Fadnavis Government) टीका देखील झाली. त्यामुळे आता उद्धव ठाकरे महाराष्ट्र दौऱ्यावर जाण्यापूर्वीच शिंदे-फडणवीस महाराष्ट्र दौरा करण्यार असल्याची माहिती समोर येत आहे. ठाकरे गटाचे बालेकिल्ले असलेल्या भागात शिंदे-फडणवीस एकत्रित दौरा करणार असल्याची माहिती सूत्रांनी दिली आहे.

राज्यात सत्तांतर झाल्यानंतर उद्धव ठाकरे यांचा हा पहिलाच दौरा असणार आहे.
येत्या दोन-तीन महिन्यामध्ये राज्यात प्रमुख महापालिकांच्या निवडणुका आहेत,
यामध्ये मुंबईचा (BMC) समावेश आहे. भाजपसह (BJP) सर्वच पक्षांनी या निवडणुकीसाठी कंबर कसली आहे.
आगामी निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर हे दोन्ही दौरे महत्त्वाचे ठरणार आहेत.

Web Title :-  Maharashtra Daura | eknath shinde devendra fadnavis maharashtra tour from saturday

Join our WhatsApp GroupTelegramfacebook page and Twitter for every update

हे देखील वाचा

Virat Kohli | जयवर्धनेचा विक्रम मोडण्यासाठी विराट सज्ज; 89 धावा करताच बनणार टी-20 चा ’किंग’

Deepak Kesarkar| शालेय विद्यार्थ्यांना पुस्तकांसोबत वह्या देखील मोफत मिळणार, शालेय शिक्षण मंत्री दीपक केसरकरांची मोठी घोषणा