Maharashtra DCP / Addl SP / SP Transfers | 16 उपायुक्त / पोलिस अधीक्षक / अप्पर अधीक्षक दर्जाच्या पोलिस अधिकार्‍यांच्या पुण्यात बदल्या

पुणे एसीबीमध्ये अमोल तांबे तर पिंपरी-चिंचवडमध्ये स्वप्ना गोरे, विवेक पाटील पुण्यात संदीप सिंह गिल्ल, स्मार्तना पाटील, सुहेल शर्मा, शशिकांत बोराटे, विक्रांत देशमुख, अमोल झेंडे आणि विजयकुमार मगर DCP म्हणून; पुणे ग्रामीणच्या अप्पर अधीक्षकपदी आनंद भोईट तर सीआयडीमध्ये अरविंद चावरिया

 

मुंबई : पोलीसनामा ऑनलाइन – Maharashtra DCP / Addl SP / SP Transfers | गृह विभागाने आज (सोमवार) राज्यातील तब्बल 104 पोलिस उपायुक्त / अप्पर अधीक्षक / पोलिस अधीक्षक दर्जाच्या पोलिस अधिकार्‍यांच्या बदल्या केल्या आहेत. त्यामध्ये उपायुक्त / पोलिस अधीक्षक / अप्पर अधीक्षक दर्जाचे 16 अधिकारी पुण्यात बदलून आले आहेत. (Maharashtra DCP / Addl SP / SP Transfers)

 

पोलिस अधिकार्‍यांचे नाव आणि त्यापुढील कंसात कोठून कोठे हे पुढील प्रमाणे 

 

1. अरविंद एच. चावरिया (पदस्थापनेच्या प्रतिक्षेत ते पोलिस अधीक्षक, गुन्हे अन्वेषय विभाग, पुणे)

2. संदीप सिंह गिल्ल (समादेशक, रा.रा. पोलिस बल, गट क्र. 12, हिंगोली ते पोलिस उपायुक्त, पुणे शहर)

3. राजेश बनसोडे (एसपी, एसीबी, पुणे ते पोलिस अधीक्षक, बिनतारी संदेश (एसपी, वायरलेस), पुणे

4. स्मार्तना एस. पाटील (पोलिस अधीक्षक, बिनतारी संदेश, पुणे ते पोलिस उपायुक्त, पुणे शहर)

5. अमोल एस. तांबे (पोलिस उपायुक्त झोन- 1, नाशिक शहर ते एसपी, एसीबी, पुणे शहर)

6. सुहेल शर्मा (पदस्थापनेच्या प्रतिक्षेत ते पोलिस उपायुक्त, पुणे शहर)

7. प्रविण पाटील (पदस्थापनेच्या प्रतिक्षेत ते समादेशक, रा.रा. पोलिस बल, गट क्र.1, पुणे)

8. दीपक पी. देवराज (एसपी, महाराष्ट्र राज्य सुरक्षा महामंडळ, मुंबई ते समादेशक, रा.रा. पोलिस बल, गट क्र.2, पुणे)

 

9. शशिकांत देवराव बोराटे (प्राचार्य, पोलिस प्रशिक्षण केंद्र, खंडाळा ते उपायुक्त, पुणे शहर)

10. आनंद ए. भोईट (डीसीपी, झोन-2, पिंपरी-चिंचवड ते अप्पर अधीक्षक, बारामती, पुणे ग्रामीण)

11. विक्रांत विश्वास देशमुख (अप्पर अधीक्षक, जालना ते उपायुक्त, पुणे शहर)

12. राजलक्ष्मी सतिश शिवणकर (एसपी, सीआयडी, नागपूर ते पोलिस अधीक्षक, लोहमार्ग, पुणे)

13. अमोल भाऊसाहेब झेंडे (पोलिस अधीक्षक, नागरी हक्क संरक्षण, ठाणे ते पोलिस उपायुक्त, पुणे शहर)

14. स्वप्ना एच. गोरे (प्राचार्य, पोलिस प्रशिक्षण केंद्र, सोलापूर ते पोलिस उपायुक्त, पिंपरी-चिंचवड)

15. विजयकुमार मगर (पदस्थापनेच्या प्रतिक्षेत ते उपायुक्त, पुणे शहर)

16. विवेक पाटील (पोलिस उपायुक्त, पुणे शहर ते पोलिस उपायुक्त, पिंपरी-चिंचवड)

 

Web Title :- 16 Transfers of Deputy Commissioner / Superintendent of Police / Upper Superintendent of Police to Pune

 

Join our WhatsApp GroupTelegramfacebook page and Twitter for every update

हे देखील वाचा