उपमुख्यमंत्री अजित पवार ‘कोरोना’ पॉझिटिव्ह

मुंबई : वृत्तसंस्था – राज्याचे उपमुख्यमंत्री आणि राष्ट्रवादी काँग्रेस (Nationalist Congress) चे नेते अजित पवार(DCM Ajit Pawar)यांना कोरोनाची लागण झाली आहे. गेल्या काही दिवसांपासुन ते होम क्वारंटाईन होते मात्र आता त्यांना मुंबई(Mumbai)तील रूग्णालयात दाखल करण्यात आलं आहे. गेल्या काही दिवसांपासुन त्यांच्या प्रकृतीबाबत बातम्या समोर येत होत्या. एवढच नव्हे तर सुरूवातीला त्यांनी घरीच विश्रांती घेत घरातून कामाचा धडाका लावला होता. आज मात्र त्यांना कोरोनाची लागण झाल्याची माहिती समोर आली आहे.

अजित पवार यांना काही दिवसांपुर्वी अस्वस्थ वाटत असल्याने त्यांनी घरीच विश्रांती घेण्याचं ठरवलं होते. त्यावेळी अजित पवार यांना कोरोनाची लागण झाली अशी अफवा देखील पसरली होती. त्यानंतर पार्थ पवार यांनी त्याबाबतच्या वृत्ताचं खंडण केलं होतं. मात्र, आता एएनआय वृत्तसंस्थेनं दिलेल्या माहितीनुसार राज्याचे उपमुख्यमंत्री अजित पवार यांना कोरोनाची लागण झाली असून त्यांना उपचारासाठी मुंबईतील रूग्णालयात दाखल करण्यात आल्याची माहिती देण्यात आली आहे.

You might also like