पोलिसांच्या ‘संचार’ विश्रामगृहाचे महासंचालकांच्या हस्ते उद्घाटन

पुणे : पोलीसनामा ऑनलाइन – पोलीस दलातील अधिकारी व कर्मचाऱ्यांना प्रशिक्षण, शासकीय, शैक्षणिक, वैद्यकीय कारणास्तव पुण्यात आल्यानंतर त्यांना तात्पुरत्या कालावधीसाठी राहण्याची व्यवस्था व्हावी यासाठी बांधण्यात आलेल्या ‘संचार’ विश्रामगृहाचे उद्घाटन पोलीस महासंचालक सुबोध कुमार जयस्वाल यांच्या हस्ते झाले. या विश्रामगृहाची उभारणी पुण्यातील पोलीस बनतारी संदेश मुख्यालय येथे करण्यात आली आहे. ही वास्तू अपर पोलीस महासंचालक व संचालक पोलीस बिनतारी संदेश रितेश कुमार यांच्या संकल्पनेतून उभारण्यात आली आहे.

Sanchar

यावेळी पुणे शहर पोलीस आयुक्त डॉ. वेंकटेशम, अपर पोलीस महासंचालक राज्य गुन्हे अन्वेषण विभाग अतुलचंद्र कुलकर्णी, पिंपरी चिंचवड पोलीस आयुक्त संदीप बिश्नोई यांच्यासह पोलीस दलातील विविध घटकांचे अन्य वरिष्ठ पोलीस अधिकारी उपस्थित होते. पुणे येथे कामानिमीत्त आल्यानंतर पोलीस अधिकारी आणि कर्मचाऱ्यांना तात्पुरत्या स्वरुपात राहण्याची सोय व्हावी यासाठी या विश्रामगृहाची उभारणी करण्यात आली आहे. ही वास्तू बिनतारी संदेश मुख्यालयातील उपलब्ध जागेत आणि कमी कालावधीत उभारण्यात आली आहे. या विश्रामगृहामुळे कामानिमीत्त पुण्यात येणाऱ्या पोलीस अधिकारी आणि कर्मचाऱ्यांची राहण्याची सोय होणार आहे.

नव्याने उभारण्यात आलेल्या ‘संचार’ विश्रामगृह वातानुकुलित आहे. यामध्ये एकूण 30 खोल्या आहेत. पुणे येथे शासकीय कामासाठी, प्रशिक्षणासाठी, शैक्षणिक, वैद्यकीय अशा तात्पुरत्या स्वरुपातील कामासाठी येणाऱ्या अधिकारी, कर्मचारी आणि त्यांच्या कुटुंबीयांना निवासाची सोय उपलब्ध व्हावी यासाठी या वास्तूची उभारणी करण्यात आली आहे. निवासादरम्यान, अनुदानित तत्वावर अल्पदरात उपहारगृहाची सोय करण्यात आली आहे. याचा लाभ बिनतारी मुख्यालयात येणाऱ्या इतर घटकातील पोलीस अधिकारी आणि कर्मचाऱ्यांना घेता येणार आहे.

फेसबुक पेज लाईक कराhttps://www.facebook.com/policenama/