Maharashtra Din | महाराष्ट्र राज्य स्थापनेच्या ६३ व्या वर्धापन दिनानिमित्त 1 मे रोजी ध्वजारोहण समारंभ

पुणे : Maharashtra Din | महाराष्ट्र राज्य स्थापनेचा ६३ व्या वर्धापन दिन समारंभानिमित्त सोमवार १ मे रोजी सकाळी ८ वाजता पोलीस संचलन मैदान, शिवाजीनगर (Shivaji Nagar Pune) येथे राज्याचे उच्च व तंत्रशिक्षण मंत्री तथा जिल्ह्याचे पालकमंत्री चंद्रकांत पाटील (Chandrakant Patil) यांच्या हस्ते ध्वजारोहणाचा मुख्य समारंभ होणार आहे. (Maharashtra Din)

राष्ट्रध्वजास मानवंदना व पोलीस दल, गृहरक्षक दल, नागरी संरक्षण दल आदींच्या संयुक्त संचलनाचा शासकीय समारंभ होणार असून पालकमंत्री श्री. पाटील हे या प्रसंगी मानवंदना स्वीकारतील. (Maharashtra Din)

दरम्यान निमंत्रितांना या मुख्य शासकीय समारंभात सहभागी होता यावे यासाठी या दिवशी सकाळी ७.१५ ते ९ वा.
या कालावधीत ध्वजारोहणाचा किंवा इतर कोणताही शासकीय किंवा अर्धशासकीय समारंभ आयोजित करण्यात
येऊ नये. एखाद्या कार्यालयास, संस्थेला आपला ध्वजारोहण समारंभ आयोजित करावयाचा असल्यास त्यांनी
तो सकाळी ७.१५ वा. पूर्वी किंवा ९ वा. नंतर आयोजित करावा.

पुणे शहरातील सर्व केंद्र तसेच राज्य शासनाचे विभाग प्रमुख, प्रादेशिक प्रमुख, कार्यालयीन प्रमुख व
पुणे शहरातील विविध क्षेत्रातील सन्माननीय व्यक्तींनी समारंभास सकाळी ७.४५ वाजता उपस्थित रहावे,
असे आवाहन निवासी उपजिल्हाधिकारी ज्योती कदम यांनी केले आहे.

Web Title :- Maharashtra Din | Flag hoisting ceremony on 1st May to mark the 63rd anniversary of the formation of the state of Maharashtra

Join our WhatsApp Group, Telegramfacebook page and Twitter for every update

हे देखील वाचा

Pune Police Crime Branch News | पुणे क्राईम ब्रँच न्यूज : दुकानातून सिगारेटचे बॉक्स चोरणारी आंतरराज्यीय टोळी गजाआड; 4 लाखाचा मुद्देमाल जप्त

Whatsapp New Feature | Whatsapp चं नवं फीचर, एक अकाऊंट चार फोनमध्ये वापरता येणार