Maharashtra Education Department | पाठ्यपुस्तकांमध्ये नोटबुकच्या पानांचा समावेश; नेमकं लिहायचं काय? जाणून घ्या शिक्षण विभागाच्या मार्गदर्शन सूचना

मुंबई : पोलीसनामा ऑनलाइन – Maharashtra Education Department | महाराष्ट्र शालेय शिक्षण विभागाने (Maharashtra Education Department) नुकतीच पाठ्यपुस्तकांमध्ये नोटबुकच्या (Notebook) पानांचा प्रभावी वापर करण्याबाबत सर्वसाधारण मार्गदर्शक तत्त्वे (Guidelines) जारी केली आहेत. पाठ्यपुस्तकांमध्ये नोटबुकची पृष्ठे समाविष्ट केले आहेत. ही पाने ”माझी नोंद’ (My Note) या शीर्षकाखाली दिली आहेत. ही सर्व पाठ्यपुस्तके प्रायोगिक स्वरूपात इयत्ता पहिली ते आठवीपर्यंत (Class 1st to 8th) एकात्मिक पद्धतीने चार भागांत प्रकाशित करण्यात आली आहेत. या पाठ्यपुस्तकांच्या पानांचा प्रभावी आणि योग्य वापर करण्यासाठी शिक्षकांसाठी परिपत्रक जारी करण्यात आले. प्रत्येक विद्यार्थ्याच्या ‘माय रेकॉर्ड’ म्हणजेच ‘माझी नोंद’ यामधील नोंदी सारख्याच असाव्यात असा आग्रह नसावा, असे त्यात म्हटले आहे.

शालेय शिक्षण विभागाकडून (Maharashtra Education Department) नव्या मार्गदर्शन सूचना जारी करण्यात आल्या आहेत. त्यामध्ये कच्चे काम (पेन्सिलने), सूत्रलेखन, महत्त्वाचे संबोध, गणित सोडवण्याची वेगळी रीत मांडणे, पाढे तयार करणे, पडताळणी करणे इत्यादी. नियम, सूत्रे, घटना, संबंध, घटनाक्रम आकृत्या, ओघतक्ता, संकल्पनाचित्र, मुक्तोत्तरी प्रश्नांची नोंद, तुलनात्मक नोंदी, व्यावहारिक अनुभव विश्वातील उदाहरणे, नावीन्यपूर्ण उपक्रमांची नोंद, स्वनिर्मित उदाहरणांची नोंदी. शब्दार्थ, प्रतिशब्द, संकल्पना, पर्यायी शब्द, वाक्प्रचार, जोडशब्द, म्हणी, भाषिक खेळ, भाषिक सौंदर्य असणारी वाक्ये, व्याकरणातील व्याख्या व उदाहरणे, महत्त्वाचे जोडशब्द, विरुद्धार्थी, समानार्थी शब्द, सुविचार, सुभाषित, ब्रीदवाक्ये, भाषिक खेळ, इंग्रजीतील शब्दांचे उच्चारण देवनागरी लिपीमध्ये लिहिणे. नोंदवणे. सहसंबंध लावण्यासाठी, महत्त्वाच्या संकल्पना उतरवण्यासाठी, विस्तारित अर्थ.

‘या’ पानांचा वापर कसा?

– सर्व विदयार्थ्यांनी तारीखवार नोंदी करणे.
– वर्गातील चर्चेदरम्यान उपस्थित झालेले मुद्दे लिहून ठेवण्यासाठी.
– महत्त्वाचे मुद्दे नोंदवून घेण्यासाठी.
– वर्गात सूचवलेले प्रश्न नोंदवण्यासाठी.
– काही संदर्भ, वर्तमानपत्रांत विषयांच्या अनुषंगाने आलेली विविध प्रकारची माहिती, साहित्यांची नोंद घेणे.
– माध्यमे इत्यादींद्वारे प्रकाशित झालेल्या अवांतर माहितीची
– पाठ्यपुस्तक बाहेरील माहिती लिहून ठेवण्यासाठी.
– पाठ्यपुस्तकांबाहेरील व आशयाला पूरक माहितीची नोंद घेणे.
– अध्ययन-अध्यापन प्रक्रियेदरम्यान उपस्थित झालेले प्रश्न लिहिणे.
– चित्राकृती, चित्र, आलेख, आकृत्या काढण्यासाठी. मुद्दे लिहून ठेवण्यासाठी.

उपक्रमाचा नेमका उद्देश काय?

Advt.

– दप्तराचे ओझे कमी होण्यास मदत होईल.
– पाठ्यपुस्तकांचे स्वयंअध्ययन करताना या नोदींचा वापर विद्यार्थ्यांना करता येईल.
– प्रत्याभरण (Feedback) आणि दृढीकरण (Fixation) होईल.
– विद्यार्थ्यांना स्वत:च्या शब्दांमध्ये स्वतःच्या नोंदी करता येतील आणि सवय त्यांच्या अंगवळणी पडेल.
– शिक्षकांनी दिलेली उदाहरणे विद्यार्थ्यांना ‘माझी नोंद’ यामध्ये नोंदवता येतील.
– स्वत:चे सुलभ संदर्भ साहित्य तयार होईल.
– स्वत:चे मुद्दे विदयार्थ्यांना काढता येतील.
– आशयानुसार दिलेल्या विशेष नोंदी करता येतील.
– अवांतर वाचनातून तयार झालेल्या महत्त्वाच्या नोंदी घेता येतील.
– अध्ययनासाठी नोंदणीची उपयुक्तता.
– पाठाची शिकलेली सर्व माहिती नोंद घेतलेल्या मुद्द्यांच्या आधारे पुन्हा आठवणे सुलभ होईल.
– अध्यायनाच्या या सवयीचा फायदा त्यांना पुढील इयत्तांमध्ये उपयोगी पडेल.
– एकाच पाठ्यपुस्तकात सर्व विषय असल्याने विषयांमधील सहसंबंध शोधणे सुलभ होईल.
– घटक चाचणी व सत्र परीक्षा या संदर्भाने नियोजन करणे सोपे होईल.
– पालकांना वर्गात काय शिकवले आहे हे कळेल.

Web Title :  Maharashtra Education Department | Maharashtra education department issued new guidelines what exactly should be written on notebook pages in textbooks Marathi News

Join our WhatsApp GroupTelegramfacebook page and Twitter for every update

हे देखील वाचा

Pune Gold Rate Today | काय आहेत आजचे पुण्यातील सोन्या-चांदीचे दर? जाणून घ्या

Petrol Diesel Price Today | सर्वसामान्यांसाठी दिलासा! पेट्रोल-डिझेलचे दर कमी होण्याची शक्यता; जाणून घ्या आजचा दर

Maharashtra Monsoon Update | पुढील 24 तासांत वादळी वाऱ्यांसह पावसाची शक्यता; मुंबई, ठाणेसह कोकणातही बरसणार सरी