‘चंपा’नंतर ‘नाच्या’ ! अजित पवारांचा भाजपच्या ‘या’ नेत्यावर ‘निशाणा’ेेेेेेेेेेेेेेेेेेेेेेेेेेेेेेेेेेेेेेेेेेेेेेेेेेेेेेेेेेेेेेेेेेेेेेेेेेेेेेेेेेेेेेेेेेेेेेेेेेेेेेेेेेेेेेेेेेेेेेेेेेेेेेेेेेेेेेेेेेेेेेेेेेेेेेेेेेेेेेेेेेेेेेेेेेेेेेेेेेेेेेेेेेेेेेेेेेेेेेेेेेेेेेेेेेेेेेेेेेेेेेेेेेेेेेेेेेेेेेेेेेेेेेेेेेेेेेेेेेेेेेेेेेेेेेेेेेेेेेेेेेेेेेेेेेेेेेेेेेेेेेेेेेेेेेेेेेेेेेेेेेेेेेेेेेेेेेेेेेेेेेेेेेेेेेेेेेेेेेेेे

मंगळवेढा : पोलीसनामा ऑनलाइन – विधानसभेच्या निवडणुकांत आरोप प्रत्यारोपांच्या फैरी सुरु आहेत. सत्ताधाऱ्यांनी केवळ घोषणाच केल्या आणि सर्वसामान्यांना दिलासा देण्याऐवजी सत्ताधाऱ्यांनी सत्तेचा गैरवापर करत शेतकरी विरोधात धोरण अवलंबले अशा प्रकारचा हल्लाबोल अजित पवार यांनी भाजप सरकारवर केला आहे. मंगळवेढा येथे आयोजित राष्ट्रवादी काॅंग्रेसच्या उमेदवारांच्या प्रचारार्थ जाहीर सभेत अजित पवार बोलत होते.

हलगीच्या तालावर झिंगाट झालेल्या नाच्याच्या शब्दावर विश्वास ठेवू नका. सारखे-सारखे कुंकू बदलणारे तुमच्याशी प्रामाणिक काय राहणार अशा शब्दांत राष्ट्रवादीचे पूर्वाश्रमीचे नेते आणि सध्याचे भाजपा उमेदवार लक्ष्मण ढोबळे यांच्यावरही अजित पवारांनी सडकून टीका केली आहे. काँग्रेस-राष्ट्रवादीची सत्ता असताना आमदार केले, पालकमंत्री केले, ते उपकार विसरले की काय ? आपले वय काय, आपण काय करतो याचेही भान नाही, अशा प्रकारचा घणाघात अजित पवारांनी यावेळी ढोबळेंवर केला आहे.

या आधी अजित पवारांनी चंद्रकांत पाटील यांची ‘चंपा’ म्हणून थट्टा केली होती. पाकिस्तानमधून साखर, कांदा आयात करण्यात सरकार व्यस्त आहे. कर्जमाफी कशी करायची ते माझ्या काकांना विचारा, गेल्या पाच वर्षात शेतकऱ्यांना मातीत घालण्याचं काम सत्ताधाऱ्यांनी केलं आहे अशा प्रकारची टीका अजित पवारांनी यावेळी भाजपवर केली आहे.

Visit : Policenama.com 

बाळाला फ्रूट ज्यूस देणे टाळा, जाणून घ्या कारणे
वाढत्या वजनावर कसे ठेवावे नियंत्रण ? आहार आणि व्यायामाबाबत जाणून घ्या
दाढ दुखत असल्यास करा ‘हा’ घरगुती उपाय, अशी घ्या काळजी
चॉकलेट खा… आणि हृदय ठेवा तंदुरुस्त, जाणून घ्या काय आहे यामध्ये
तुपापेक्षा तेल आहे घातक ! जाणून घ्या कारणे
अन्नाची चव वाढविणाऱ्या या मीठाचे आहेत अनेक फायदे, जाणून घ्या
शरीरयष्टी खुपच किरकोळ आहे का ? मग वजन वाढविण्यासाठी करा ‘हे’ ८ उपाय
महिलांना दम्याचा आजार होण्याची शक्यता अधिक, जाणून घ्या कारण
‘डायबेटिस’ चा झोप आणि आहाराशी निकटचा संबंध, अशी घ्या काळजी