सुनील कांबळे यांना विजयी करा : दाक्षिणात्य सुपरस्टार ब्रह्मानंद

पुणे :  पोलीसनामा ऑनलाइन  – काही काळापूर्वी गायकवाड यांच्या प्रचारासाठी या भागात आलो होतो. त्यांचा प्रचार केल्यामुळे ते भरघोस मतांनी विजयी झाले. आता सुनील कांबळे यांच्या प्रचारासाठी आलो आहे. त्यांनाही भरघोस मतांनी निवडून द्या, असे आवाहन दक्षिणात्य अभिनेता ब्रह्मानंद कनगती यांनी केले.

लोकांच्या प्रचंड उत्साही गर्दीमध्ये ब्रह्मानंद कनगती यांचे घोरपडी भागात आगमन झाले. त्यांनी तेलगू भाषेत उपस्थितांशी संवाद साधला. त्यांनी सादर केलेल्या चित्रपटातील संवादांनाही लोकांनी उत्स्फूर्त प्रतिसाद दिला. यावेळी माजी मंत्री दिलीप कांबळे, नगरसेविका हिमाली कांबळे, नगरसेविका किरण मंत्री, दिलीप गिरमकर, गोपाळ चिंतल, संगीता आठवले, विवेक यादव, आरपीआयचे महेंद्र कांबळे आदी उपस्थित होते.

महायुतीचे उमेदवार सुनील कांबळे यांनीही नागरिकांशी संवाद साधला. घोरपडी उड्डाणपुलाच्या संदर्भात काँग्रेसने केलेले आरोप खोडसाळपणाचे असून त्यांच्याकडे त्याचा कुठलाही पुरावा नाही. या पुलासाठी स्वर्गीय केंद्रीय मंत्री मनोहर पर्रीकर, चंद्रकांतदादा पाटील तसेच स्थायी समितीच्या माध्यमातून मी देखील प्रयत्न केले. स्थायी समितीच्या माध्यमातून 28 कोटी रुपयांची तरतूद या पुलासाठी केली. मात्र काही लोक चुकीचे आरोप करत लोकांची दिशाभूल करीत आहेत. मतदारांनी त्यांच्या प्रलोभनांना बळी पडू नये आणि भाजपच्या पाठीशी ठामपणे उभे राहावे, असे आवाहनही कांबळे यांनी केले. यांनी यावेळी उत्तर प्रदेशातील आमदार रवि सतिजा मोदींवरील जोशपूर्ण कविता सादर करून उपस्थितांचे मनोरंजन केले.

Visit : Policenama.com 

बाळाला फ्रूट ज्यूस देणे टाळा, जाणून घ्या कारणे
वाढत्या वजनावर कसे ठेवावे नियंत्रण ? आहार आणि व्यायामाबाबत जाणून घ्या
दाढ दुखत असल्यास करा ‘हा’ घरगुती उपाय, अशी घ्या काळजी
चॉकलेट खा… आणि हृदय ठेवा तंदुरुस्त, जाणून घ्या काय आहे यामध्ये
तुपापेक्षा तेल आहे घातक ! जाणून घ्या कारणे
अन्नाची चव वाढविणाऱ्या या मीठाचे आहेत अनेक फायदे, जाणून घ्या
शरीरयष्टी खुपच किरकोळ आहे का ? मग वजन वाढविण्यासाठी करा ‘हे’ ८ उपाय
महिलांना दम्याचा आजार होण्याची शक्यता अधिक, जाणून घ्या कारण
‘डायबेटिस’ चा झोप आणि आहाराशी निकटचा संबंध, अशी घ्या काळजी