खळबळजनक ! ‘बटन कुठलंही दाबा, मत फक्त कमळालाच’, भाजपाच्या ‘या’ उमेदवाराचा दावा (व्हिडिओ)

नवी दिल्ली : वृत्तसंस्था – महाराष्ट्र आणि हरियाणा राज्यातील विधानसभा निवडणुकांसाठी सोमवारी (दि.21) मतदान होत आहे. प्रचाराच्या तोफा थंडावल्यानंतर उमेदवारांकडून गुप्तपणे प्रचार सुरु असून गावोगावी-घरोघरी जाऊन मतदारांच्या भेटी घेत आहेत. हरियाणातील एका भाजपच्या उमेदवाराने एक दावा केले आसून त्याच्या या दाव्यामुळे खळबळ उडाली आहे. असांध विधानसभा मतदारसंघातील उमेदवार बख्शीश सिंह विर्क यांनी कमळालाच मतदान करण्याचे धमकीवजा आवाहन केले आहे.

बख्शीशसिंह यांच्या वक्तव्याचा व्हिडीओ सध्या सोशल मीडियावर प्रचंड व्हायरल होत आहे. मतदारसंघातील एका सभेच्या भाषणावेळी त्यांनी ईव्हिएम मशिन सेट असल्याचा धक्कादायक दावा केला आहे. तसेच मतदारांना आवाहन करताना, तुम्ही कुठलंही बटण दाबा, मत कमळालाच पडणार असल्याचा दावा विर्क यांनी केला आहे. जर तुम्ही चूक केली , तर त्याची सजा तुम्हाला 5 वर्षे भोगावी लागेल, असे म्हटले आहे.

बख्शीशसिंह यांच्या व्हायरल व्हिडीओमध्ये त्यांनी मतदारांना म्हटले आहे की, कोणी कुठ मतदान केलं, याची आम्हाला माहिती मिळेलच. जर तुम्ही म्हणाल तर तेही सांगी. मोदी आणि मनोहरलाल यांच्या नजरा तिष्ण असून तुम्ही कुठेही मत द्या, भेटणार तर कमळालाच. आम्ही मिशिन सेट केल्या आहेत, असे खळबळजनक विधान त्यांनी केले आहे. त्यांच्या या खळबळजनक वक्तव्याने राजकीय वर्तुळात खळबळ उडाली आसून भाजपकडून ईव्हीएम सेट असल्याचा दावाच एकप्रकारे विर्क यांनी केला आहे.

visit : Policenama.com

पोलीसनामा न्युज आता टेलीग्रामवर... आमचं चॅनेल (@policenamanews) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.
WhatsAPP
You might also like