‘आयत्या बिळात चंदूबा म्हणजे कोथरूडमध्ये ‘चंपा’ जे करताहेत ते’ : राष्ट्रवादी

मुंबई : पोलीसनामा ऑनलाइन – विधानसभेचं मतदान काही दिवसांवर येऊन ठेपलं आहे. अशातच प्रचार आता अंतिम टप्प्यात आहे, त्यामुळे सत्ताधाऱ्यांवरील आरोपांचा वर्षाव वाढू लागला आहे. माजी उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी चंद्रकांत पाटील यांचे ‘चंपा’ असे नामकरण केले होते आणि त्यावर चंपा हा नावाचा शॉर्टफॉर्म असल्याचे सांगितले होते. आता पुन्हा एकदा राष्ट्रवादीकडून चंद्रकांत पाटील यांना डिवचण्याचा प्रयत्न झाला आहे.

राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाने आपल्या अधिकृत ट्विटवरून काही म्हणींचा बदललेला अर्थ असं म्हणत एक पोस्ट टाकली आहे, ज्यात ‘आयत्या बिळात चंदूबा’ म्हणजेच कोथरूडमध्ये चंपा जे करताहेत ते’ असे म्हटले आहे.

चंद्रकांत पाटील हे सध्या पुण्याच्या कोथरूड मतदारसंघातून विधानसभेच्या रिंगणात आहेत. कोल्हापूर हे चंद्रकांत पाटील यांचे कार्यक्षेत्र राहिलेलं आहे. मात्र कोथरूडला ते निवडणूक लढवताहेत त्यामुळे राष्ट्रवादीकडून त्यांना टोमणा मारण्यात आला आहे.

गेल्या विधानसभेला कोथरुडमधून मेधा कुलकर्णी भाजप कडून एक लाखांपेक्षा अधिक मताधिक्याने निवडून आल्या होत्या. मात्र या वेळी त्यांना खाली बसवून पक्षाने चंद्रकांत पाटील यांना तिकीट दिले आहे. यामुळे कोथरूडकरांमध्ये प्रचंड नाराजीची भावना होती. ब्राह्मण महासंघाने तर याचा जोरदार विरोध देखील केला होता. विरोधात असलेल्या राष्ट्रवादीने चंद्रकांत पाटील यांच्याविरोधात आपला उमेदवार न देऊन मनसेचे उमेदवार किशोर शिंदे यांना पाठींबा दर्शवला आहे.

Visit : Policenama.com 

बाळाला फ्रूट ज्यूस देणे टाळा, जाणून घ्या कारणे
वाढत्या वजनावर कसे ठेवावे नियंत्रण ? आहार आणि व्यायामाबाबत जाणून घ्या
दाढ दुखत असल्यास करा ‘हा’ घरगुती उपाय, अशी घ्या काळजी
चॉकलेट खा… आणि हृदय ठेवा तंदुरुस्त, जाणून घ्या काय आहे यामध्ये
तुपापेक्षा तेल आहे घातक ! जाणून घ्या कारणे
अन्नाची चव वाढविणाऱ्या या मीठाचे आहेत अनेक फायदे, जाणून घ्या
शरीरयष्टी खुपच किरकोळ आहे का ? मग वजन वाढविण्यासाठी करा ‘हे’ ८ उपाय
महिलांना दम्याचा आजार होण्याची शक्यता अधिक, जाणून घ्या कारण
‘डायबेटिस’ चा झोप आणि आहाराशी निकटचा संबंध, अशी घ्या काळजी