आम्ही काही ‘नटरंग’ नाही, त्यामुळे हातवारे करत नाही : मुख्यमंत्री फडणवीस

जळगाव : पोलीसनामा ऑनलाइन – विधानसभा निवडणुकीचा प्रचार शिगेला पोहचला असून एकमेकांवर कुरघोड्या, आरोप-प्रत्यारोप केले जात आहे. विरोधकांनी केलेल्या टिकेला सत्ताधाऱ्यांकडून तर सत्ताधाऱ्यांनी केलेल्या टीकेला विरोधकांकडून प्रत्युत्तर दिले जात आहे. सध्या ‘पैलवान’ या शब्दावारून सत्ताधारी आणि राष्ट्रवादी यांच्यामध्ये चांगलीच जुंपली आहे. लढाई पैलवानांमध्ये होते, इतरांमध्ये नाही, अशा शब्दात हातवारे करुन टीका करणाऱ्या शरद पवारांना मुख्यमंत्र्यांनी जळगावच्या सभेत जोरदार प्रत्युत्तर दिले आहे.

हातवारे करून टीका करणाऱ्या शरद पवार यांना प्रत्युत्तर देताना मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी आम्ही नटरंगी नाही त्यामुळे तसे हातवारे करीत नाही. ते आम्हाला शोभत नाही. पवारांची मानसिकता ढासळी अल्याने असे हातवारे करीत आहेत, असा टोला देवेंद्र फडणवीस यांनी लागवाला आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांची विधानसभा प्रचाराची पहिली सभा जळगाव येथे झाली. त्यावळी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी ही घणाघाती टीका केली.

मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी आपल्या भाषणाच्या सुरुवातीलाच शरद पवार यांचा खरपुस समाचार घेतला. खरा पैलवान कोण ? हे जनता येत्या 24 ऑक्टोबरला दाखवून देईल. तसेच आम्ही काही नटरंग नाही. त्यामुळे आम्ही हातवारे करत नाही. तसेच ते आम्हाला शोभतही नाही. सध्या परिस्थीतीमुळे शरद पवार यांची मानसिकता ढासळी आहे. त्यामुळे ते हातवारे करत आहेत अशी टीका देवेंद्र फडणवीस यांनी केली.

Visit : Policenama.com 

 

Loading...
You might also like