संजय निरुपम यांची काँग्रेसला आता गरज नाही : सुशिलकुमार शिंदे

सोलापूर : पोलीसनामा ऑनलाइन – काँग्रेसचे ज्येष्ठ नेते आणि माजी मुख्यमंत्री सुशीलकुमार शिंदे यांनी संजय निरुपमांवर हल्लाबोल केला आहे. एका वृत्तवाहिनीला दिलेल्या मुलाखतीमध्ये त्यांनी निरुपमांवर टीका केली आहे. त्यांना हवे असलेले उमेदवार न दिल्याने ते अशी भूमिका घेत आहेत. पक्षाला आता त्यांची गरज नाही, असे बोलणाऱ्यांची काँग्रेसला किती आवश्यकता आहे याचा विचार करावा लागेल असे म्हणत त्यांनी निरुपम यांना घरचा आहेर दिला आहे.

राष्ट्रवादी काँग्रेस आणि काँग्रेस पक्षाच्या विलिनीकरणाबाबत बोलताना शिंदे म्हणाले, आता वटतं आपण सगळ्यांनी एकत्र यायला पाहिजे. दोन्ही काँग्रेसकडे एकत्र येण्याशिवाय पर्याय राहिलेला नाही. पक्ष टिकवणं ही आजच्या परिस्थितीची गरज आहे. राहुल गांधींच्या महाराष्ट्र दौऱ्याबाबत ते म्हणाले, राहुल गांधी 13 ते 16 ऑक्टोबर दरम्यान विधानसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमिवर महाराष्ट्राच्या दौऱ्यावर येणार आहेत.

सोलापूरमध्ये झालेल्या प्रचारसभेमध्ये सुशिलकुमार शिंदे यांनी दोन्ही काँग्रेसने एकत्र येण्याचे सुचवलं होतं. कधीतरी एका झाडाखाली आम्ही वाढलेले आहोत. इंदिरा गांधी, यशवंतराव चव्हाण यांच्या नेतृत्वाखाली आम्ही काम केले आहे. प्रकृतीच्या दृष्टीने शरद पवार हे थकले आहेत. ज्या मुद्यावरून राष्ट्रवादीची स्थापना झाली तो मुद्दा आता राहिलेला नाही. त्यामुळे आता दोन्ही पक्षाचे नेते एकाच व्यासपीठावर दिसतील असा विश्वास शिंदे यांनी व्यक्त केला होता.

Visit : Policenama.com