शिवसेना, भाजप आणि राष्ट्रवादीच्या नेत्यांचा व्हॉट्सअप ग्रूप अन् सत्तास्थापनेची चर्चा !

मुंबई : पोलीसनामा ऑनलाईन – सत्ता स्थापनेचा तिढा सुटताना दिसत नसून शिवसेना आणि भाजप एकमेकांवर दबाव निर्माण करून सत्तेत मोठा वाटा घेण्याचा प्रयत्न करत आहेत. त्यानंतर आता भाजपने आणि शिवसेनेने यावर निर्णय न घेतल्याने हा सत्तापेच मोठ्या प्रमाणात वाढला आहे. मुख्यमंत्रीपदासाठी दोन्ही पक्षांमध्ये लढाई सुरु असून आज विधानसभेचा कार्यकाळ संपुष्टात येणार आहे. त्यामुळे आज राज्यात काय घडणार याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे.

दोन्ही पक्षांमध्ये सत्तास्थापनेवरून रस्सीखेच सुरु असताना सोशल मीडियावर मात्र मोठ्या प्रमाणात भाजप आणि शिवसेनेला ट्रोल करण्यात येत आहे. सध्या विविध सोशल मीडियावर मिम्स व्हायरल होत आहेत. मात्र एका व्हाटसअप चॅटने सर्वांचे लक्ष वेधून घेतले आहे. यामध्ये सर्व प्रकारचे राजकीय नेते आणि सर्व पक्षांचे नेते सत्तास्थापनेवरून चर्चा करताना दिसून येत आहेत. यामध्ये हे नेते सत्तास्थापनेवरून चर्चा करताना दिसून येत असून यामध्ये मोठी गंमत आहे.

या ग्रुपमध्ये संजय राऊत, उद्धव ठाकरे, शरद पवार, सुप्रिया सुळे, आदित्य ठाकरे, पंकजा मुंडे, देवेंद्र फडणवीस आणि दस्तुरखुद्द अमित शहा हेदेखील या संभाषणामध्ये दिसून येत आहेत. यामध्ये नेत्यांचे संभाषण दाखवण्यात आले असून यामध्ये उद्धव ठाकरे भाजपवर दबाव वाढवून सत्तेमध्ये जास्त वाटा घेण्याचे म्हणत आहेत. त्याचबरोबर राष्ट्रवादीला बरोबर सरकार स्थापन करण्याची देखील ऑफर देत आहेत. त्याचबरोबर इतर राजकीय नेते देखील चर्चेत सहभागी होत असल्याचे दिसून येत आहे.

दरम्यान, विधानसभेची मुदत आज संपत असून भाजप आणि शिवसेना काय निर्णय घेणार याकडे सर्वांचे लक्ष लागून आहे.

Visit : Policenama.com 

पोलीसनामा न्युज आता टेलीग्रामवर... आमचं चॅनेल (@policenamanews) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.
WhatsAPP
You might also like