भाजपाचे ज्येष्ठ नेते एकनाथ खडसेंनी ‘हा’ निर्णय घेतला ?

मुक्ताईनगर : पोलीसनामा ऑनलाईन – माजी मंत्री आणि भाजपाचे वरिष्ठ नेते एकनाथ खडसेंऐवजी त्यांची कन्या अ‍ॅड. रोहिणी खडसे मुक्ताईनगर येथून भाजपच्या उमेदवार असतील, तसेच उद्या दुपारी साडेबाराच्या मुहूर्तावर रोहिणी खडसे उमेदवारी अर्ज दाखल करणार असल्याची माहिती सूत्रांनी दिली आहे.

भाजपची 14 उमेदवारांची दुसरी यादी जाहीर झाली. या यादीत ज्येष्ठ नेते एकनाथ खडसे, विनोद तावडे, प्रकाश मेहता आणि चंद्रशेखर बावनकुळे या दिग्गज नेत्यांचा समावेश नाही. मात्र, खडसे यांनी उमेदवारी अर्ज दाखल करून पक्षनेतृत्वाला अप्रत्यक्षपणे आव्हान दिले. आता मुक्ताईनगर विधानसभा मतदारसंघाचा तिढा सुटण्याच्या मार्गावर असून त्यांच्या कन्येला उमेदवारी मिळणार असल्याची माहिती मिळाली आहे. कन्येला उमेदवारी देण्यासोबतच एकनाथ खडसेंना राज्यपाल पदही देण्याची चर्चा आहे.

एकनाथ खडसे हे जळगावमधील मुक्ताईनगर मतदारसंघातून तब्बल सहा वेळा निवडून आले आहेत. त्यामुळे या मतदारसंघात खडसेंची पकड मजबूत आहे. खडसे भाजपकडून गेल्या कित्येक दिवसांपासून उपेक्षीत आहेत. एमआयडीसी घोटाळ्या बरोबर अनेक आरोप खडसेंवर करण्यात आले होते. 2014 मध्ये महसूलसह इतर खात्यांच्या मंत्रीपदाचा राजीनामा खडसे यांना द्यावा लागला होता. त्यानंतर खडसे यांनी अनेकवेळा नाराजी बोलून दाखवली.

Visit : Policenama.com

तुमच्या मुलांच्या डोळ्यांची अशी घ्या काळजी, उपाय जाणून घ्या
जाणून घ्या ‘सेक्शुअल लाइफ’ असंतुष्ट असण्याची कारणे, अशी घ्या काळजी
चिंच आहे बहुगुणी, उन्हाचा कडाका वाढला तर आवश्य खा

शरीरात ‘या’ ठिकाणी लपतो ‘एड्स’चा व्हायरस, संशोधकांनी केला दावा
मधुमेहाचे औषध स्तनाच्या कॅन्सरवर उपयुक्त, चिनी संशोधकांचे मत
मुलांना कोणत्या वयात शाळेत घालावे? जाणून घ्या तज्ज्ञांचे मत
ऑफिसमध्ये जेवण करताना घ्यावी ‘ही’ काळजी, तुमच्यासाठी ठरु शकते फायदेशीर
नाभीवर लावा २ थेंब दारु, दूर होतील पीरियड्ससंबंधीत ‘या’ समस्या, जाणून घ्या