मोठी बातमी ! ‘हे’ 4 उमेदवार नक्की मंत्री होणार, मुख्यमंत्री फडणवीसांनी निवडणुक निकालापुर्वीच सांगितलं

मुंबई, पोलीसनामा ऑनलाइन – राज्यात विधानसभा प्रचाराने जोर पकडला आहे. मुख्यमंत्री देवेंद्र फडवणीस सध्या जोमाने प्रचार करत आहे. निवडणूक प्रचाराआधीच मुख्यमंत्र्यांना मंत्रिमंडळातील मंत्र्यांची नावे घोषित करण्यात आली आहेत. विधानसभेत यश मिळणार या विश्वासाने मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांना प्रचारात मंत्र्यांच्या नावाची घोषणा करुन टाकली. या प्रचारसभेत मुख्यमंत्र्यांनी आतापर्यंत 4 मंत्र्याची घोषणा केली आहे. 
 
निवडणूक प्रचारादरम्यान कर्जत जामखेडमध्ये राम शिंदे, माण खटावमधून जयकुमार गोरे, चांदवडमधून राहूल आहेर, आणि पुसदमधून निलय नाईक यांना मंत्रीपद देणार असल्याची घोषणा फडणवीसांनी केली. राम शिंदेच्या विरोधात कर्जत जामखेड मतदरासंघातून राष्ट्रवादीचे रोहित पवार निवडणूक रिंगणात उतरले आहे. त्यामुळे पवारांसाठी निवडणूक अत्यंत प्रतिष्ठेची झाली आहे. त्या मतदारसंघातून राम शिंदे 50 हजारांच्या लिडने निवडणूक द्या, त्यांना मंत्री बनवू असे आवाहन मुख्यमंत्री फडणवीस यांनी केले आहे.
 
साताऱ्यात माण खटाव मतदारसंघात चांगलीच चुरस पाहायला मिळाली. भाजपकडून याठिकाणी जयुकमार गोरे यांना उमेदवारी देण्यात आली आहे. तर शिवसेनेचे बंडखोर उमेदवार शेखर गोरे यांनी अपक्ष अर्ज दाखल केला आहे. त्यामुळे माण खटावच्या सभेत फडणवीस यांना जयकुमार गोरे यांना देखील मंत्री बनवी अशी ग्वाही दिली आहे. मोठ्या मताने जयकुमार गोरे यांना निवडून देण्याचे आवाहन फडणवीसांकडून करण्यात आले. 
 
पुसदमध्ये देखील निलय नाईक यांना मंत्री बनवू असे मुख्यमंत्र्यांनी घोषित केले आहे. निलय नाईक यांच्याविरोधात इंद्रनील नाईक यांना राष्ट्रवादीने तिकीट दिले आहे. तर नाशिकच्या चांदवड मतदारसंघातून भाजपने राहूल आहेर यांना मैदानात उतरवले आहे, त्यांच्या विरोधात काँग्रेसने शिरीष कोतवाल यांना तिकीट दिले आहे. मुख्यमंत्र्यांनी मतदारांना मतदानाचे आवाहन करत सांगितले की राहूल आहेर यांना मंत्रीपद देऊ. यामुळे फडणवीसांची रणनीती यंदाच्या विधानसभेत यशस्वी ठरणार का हे निकालानंतर समोर येईलच आणि त्यानंतर मुख्यमंत्री फडणवीस आपले आश्वासन पूर्ण करतात की नाही हे देखील निवडणूकीनंतर लवकरच स्पष्ट होईल.
Visit : Policenama.com बाळाला फ्रूट ज्यूस देणे टाळा, जाणून घ्या कारणे
वाढत्या वजनावर कसे ठेवावे नियंत्रण ? आहार आणि व्यायामाबाबत जाणून घ्या
दाढ दुखत असल्यास करा ‘हा’ घरगुती उपाय, अशी घ्या काळजी
चॉकलेट खा… आणि हृदय ठेवा तंदुरुस्त, जाणून घ्या काय आहे यामध्ये
तुपापेक्षा तेल आहे घातक ! जाणून घ्या कारणे
अन्नाची चव वाढविणाऱ्या या मीठाचे आहेत अनेक फायदे, जाणून घ्या
शरीरयष्टी खुपच किरकोळ आहे का ? मग वजन वाढविण्यासाठी करा ‘हे’ ८ उपाय
महिलांना दम्याचा आजार होण्याची शक्यता अधिक, जाणून घ्या कारण
‘डायबेटिस’ चा झोप आणि आहाराशी निकटचा संबंध, अशी घ्या काळजी