विधानसभा 2019 : आगामी 48 तास महत्वाचे, आमदार फुटण्याच्या भीतीनं घडणार ‘हे’ समीकरण

मुंबई : पोलीसनामा ऑनलाइन – राज्यात विधानसभेचा निकाल लागून दहा दिवसांपेक्षा अधिक कालावधी उलटून गेला आहे तरीही अजून राज्यात सत्तास्थापनेच गणित जुळून आलेलं नाही, त्यामुळे भाजप शिवसेनेची मदत घेणार की राज्यात अजून एखादे नवीन समीकरण पहायला मिळणार याबाबत सगळ्यांमध्ये उत्सुकता आहे.

देवेंद्र फडणवीस यांनी गृहमंत्री अमित शहा यांची बैठक पार पडल्यावर लवकरच सत्ता स्थापन करू असे सांगिलते होते. मात्र यावेळी त्यांनी युतीचा उल्लेख टाळला होता. जर भाजपने सत्ता स्थापन केली नाही तर राज्यात राष्ट्रपती राजवट लागू होईल आणि असे झाल्यास पुढील सहा महिन्यांमध्ये भाजप विरोधातील आमदार फोडण्याची शक्यता विरोधकांना वाटते त्यामुळे शिवसेनेसोबत राष्ट्रवादी आणि काँग्रेस जातील असा अंदाज व्यक्त केला जात आहे.

संजय राऊत यांनी मात्र राज्याचा निर्णय राज्यातच होईल आणि शिवसेनेचाच मुख्यमंत्री होईल अशी गर्जना केली आहे. काँग्रेस आणि राष्ट्रवादीचे नेते राज्यातील सध्याच्या परिस्थितीबाबत राज्यपालांची भेट घेणार आहेत.

सोनिया गांधींच्या बैठकीनंतर शरद पवारांनी आम्हाला सेनेकडून कोणताही प्रस्ताव आलेला नसल्याचे सांगितले मात्र तसा प्रस्ताव आल्यास विचार करू असेही ते म्हणाले त्यामुळे आता शिवसेनेच्या निर्णयाकडे सगळ्यांचे लक्ष लागले आहे. त्यामुळे राज्याच्या राजकारणासाठी पुढील दोन दिवस खूप महत्वाचे असणार आहेत.

Visit : Policenama.com

You might also like