युतीचा कारभार ‘फटा पोस्टर निकाल झिरो’ सारखा : अजित पवार

अहमदनगर : पोलीसनामा ऑनलाइन – राज्यात सध्या जोरदार विधानसभेच्या प्रचाराचे वारे वाहत आहे त्यामुळे सत्ताधारी आणि विरोधकांमध्ये आरोप प्रत्यारोपांच्या फैरी सुरु आहेत. अहमदनगर जिल्ह्यात झालेल्या एका सभेदरम्यान माजी उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी भाजपवर चांगलाच हल्लाबोल केला आहे. गेल्या ५ वर्षांतला युतीचा कारभार म्हणजे फटा पोस्टर निकला झिरो असं म्हणायची वेळ आलीय. तरी ‘मी पुन्हा येणार’ असं CM सांगतात. कशासाठी ? असा प्रश्न यावेळी अजित पवारांनी विचारला आहे.

यावेळी बोलताना अजित पवार म्हणाले की, ‘मी पुन्हा येणार’ असं मुख्यमंत्री सांगतात. कशासाठी ? राज्याला कर्जबाजारी करण्यासाठी, बेरोजगारी वाढवण्यासाठी, संसार रस्त्यावर आणण्यासाठी, शेतकरी आत्महत्या वाढवण्यासाठी, साखर-कांदा आयात करण्यासाठी पुन्हा यायचंय ? असा टोला अजित पवारांनी लगावला.

यावेळी कर्जत जामखेडमधून विधानसभेच्या रिंगणात असलेले रोहित पवार हे सक्षमरित्या कर्जत जामखेडचे नेतृत्व करतील असा विश्वास यावेळी अजित पवारांनी व्यक्त केला आहे. मिळालेल्या सत्तेचा वापर सर्वसामान्यांच्या प्रश्नांना सोडवण्यासाठी करायचा असतो, असं शरद पवार नेहमी सांगत आले आहेत. त्यामुळे रोहितला निवडून द्यावं असं आवाहन अजित पवारांनी यावेळी केले.

शिक्षण संस्थांचं जाळं उभारल्यानं बारामती विकासात्मक दृष्टिकोनातून आणि शैक्षणिकदृष्ट्या प्रगती पथावर आली. कर्जत-जामखेड मतदारसंघातही चांगल्या दर्जाचं शिक्षण उपलब्ध करून देण्याचा आमचा प्रामाणिक प्रयत्न राहील. महिला बचत गटाच्या वस्तू देखील बाजारात विकल्या जातील, अशी तरतूद करू असं आश्वासन अजित पवारांनी यावेळी लोकांना दिलं.

काही दिवसांपूर्वी शरद पवार आणि मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्यात चांगलाच कलगी तुरा रंगला होता आता मात्र अजित पवारांनी भाजपवर हल्लाबोल करायला सुरुवात केल्याने मुख्यमंत्री याला काय उत्तर देणार याकडे सगळ्यांचे लक्ष लागून आहे.

Visit : Policenama.com 

बाळाला फ्रूट ज्यूस देणे टाळा, जाणून घ्या कारणे
वाढत्या वजनावर कसे ठेवावे नियंत्रण ? आहार आणि व्यायामाबाबत जाणून घ्या
दाढ दुखत असल्यास करा ‘हा’ घरगुती उपाय, अशी घ्या काळजी
चॉकलेट खा… आणि हृदय ठेवा तंदुरुस्त, जाणून घ्या काय आहे यामध्ये
तुपापेक्षा तेल आहे घातक ! जाणून घ्या कारणे
अन्नाची चव वाढविणाऱ्या या मीठाचे आहेत अनेक फायदे, जाणून घ्या
शरीरयष्टी खुपच किरकोळ आहे का ? मग वजन वाढविण्यासाठी करा ‘हे’ ८ उपाय
महिलांना दम्याचा आजार होण्याची शक्यता अधिक, जाणून घ्या कारण
‘डायबेटिस’ चा झोप आणि आहाराशी निकटचा संबंध, अशी घ्या काळजी