मनसेला प्रबळ विरोधी पक्ष बनवा : राज ठाकरे

मुंबई : पोलीसनामा ऑनलाइन – पुण्यातील पहिली सभा रद्द झाल्यानंतर मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांनी आज मुंबईमध्ये सभा घेतली. मुंबईतून मनसेने आपल्या प्रचाराचा धडका सुरु केला आहे. मुंबईत दोन सभा होणार असून पहिली सभा संताक्रुझमधील मराठा कॉलनीत झाली. यावेळी त्यांनी मनसेला सत्ता नको तर राज्याला सध्या कणखर प्रबळ विरोधी पक्षाची आवश्यकता असल्याचे सांगत मनसेला विजयी करण्याचे आवाहन त्यांनी केले.

LIVE | मनसे अध्यक्ष राज ठाकरे प्रचार सभा । सांताक्रूझ, मुंबई

LIVE | मनसे अध्यक्ष राज ठाकरे प्रचार सभा । सांताक्रूझ, मुंबई

Geplaatst door Policenama op Donderdag 10 oktober 2019

विरोधी पक्षनेतेच भाजपात गेले, तुमचे प्रश्न मांडणार कोण असा सवाल करत मनसेला प्रबळ विरोधी पक्ष बनवा असे आवाहन राज ठाकरे यांनी केले आहे. भाजप आणि शिवसेनेच्या सत्तेत समाधानी माणूस आहे कुठे ? असा प्रश्न राज ठाकरे यांनी विचारला. रस्त्यांच्या खड्ड्यामुळे बळी जात आहेत. या सर्व शहरांचा विचका झाला आहे. निवडणुका आल्यानंतर जाहिरनामे देतात, आश्वासने देऊन शहरे बरबाद कली जात आहेत. पुण्यासारख्या शहरात अर्धातास पाऊस पडला तर सर्व विस्कळीत होऊ जाते. कोणी विचारले तुम्ही पुण्यात राहता का तर नागरिक सांगतात नाही आम्ही पाण्यात राहतो असे सांगतात.

PMC बँक भाजपाच्या माणसांनीच बुडवली. लोकांना पैसे देऊ शकत नाहीत. शेतकरी रडतो आहे, महिला, कामगार यांचे प्रश्न निर्माण झाले आहेत. बेरोजगारांना नोकऱ्या नाहीत. निवडणुकीच्या वेळी यायचं तुमच्या चेहऱ्यावर जाहीरनामे, वचननामे चिटकवायचे. निवडणूक झाली की तुम्हाला विसरुन जायचं हेच चाललं आहे. ईडीच्या चौकशीनंतर मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांची पहिलीच सभा आज सांताक्रुझ येथे पार पडली.

visit : policenama.com 

You might also like