‘त्या’ डान्सिंग व्हिडिओवर ओवैसींचा खुलासा, म्हणाले.. ‘मी तर पतंग उडवत होतो’ (व्हिडिओ)

औरंगाबाद : पोलीसनामा ऑनलाइन – विधानसभा निवडणूकीच्या प्रचाराच्या शेवटच्या दिवशी दिवसभर चर्चेचा विषय ठरला तो एमआयएमचे प्रमुख असदुद्दीन ओवैसी यांच्या डान्सचा व्हिडिओ. हा व्हिडिओ सोशल मिडियावर वेगाने व्हायरल झाला. या व्हिडिओत जिन्यावरुन उतरताना ते डान्स करत असताना दिसतात. या डान्सवर अखेर खुद्द ओवैसींनी खुलासा केला. ते म्हणाले की आपण नाचत नव्हतो तर पक्षाचे चिन्ह असलेल्या पतंगाचा अभिनय करुन दाखवत होतो.

व्हायरल व्हिडिओवर स्पष्टीकरण देताना ओवैसी म्हणाले की सभेला उपस्थित असलेल्यांना मी पतंग उडवण्याचा अभिनय करुन दाखवत होतो. कारण माझ्या पक्षाचे ते निवडणूक चिन्ह पतंग आहे.

ओवैसी म्हणाले की माझ्या पक्षाचे चिन्ह पतंग आहे. आमच्या प्रत्येक सभेनंतर आम्ही पतंग उडवण्याचा अभिनय करुन निवडणूक चिन्ह जास्तीत जास्त लोकांपर्यंत पोहोचावे यासाठी प्रयत्न करतो. कोणीतरी नेमका तेवढाच भाग एडिट करुन त्यावर गाणे लावून तो व्हिडिओ सोशल मीडियावर शेअर केला. यानंतर काहींनी मी नाचत असल्याचे वृत्त दिले. परंतू त्यात काहीही तथ्य नाही.

आज प्रचारच्या अखेरच्या दिवशी ओवैसींनी औरंगाबादमधील पैठण गेट येथे प्रचारसभा घेतली. यावेळी सभा झाल्यावर ते मंचावरुन खाली उतरताना पतंग उडवण्याचा अभिनय केला. एमआयएमचे विधानसभेत 9 जागा आहेत तर लोकसभेत एक खासदार आहे. एमआयएममुळे काही ठिकाणी तिरंगी लढत चांगलीच रंगली आहे. त्यात सिल्लोड, औरंगाबाद पश्चिम विधानसभा मतदारसंघात सर्वाचे लक्ष आहे. या तीनही मतदारसंघातून एमआयएमचे उमेदवार उभे आहेत. एमआयएमसाठी औरंगाबाद महत्वाचा मतदारसंघ आहे. मागच्या लोकसभा निवडणूकीत एमआयएमचे इम्तियाज जलील याच मतदार संघातून खासदार झाले. यामुळे हा मतदारसंघ ताब्यात घेण्यासाठी एमआयएमकडून ताकद पणाला लावण्यात आली आहे. त्यामुळे भाजप-शिवसेना युतीसाठी ही निवडणूक प्रतिष्ठेची झाली आहे.

Visit : Policenama.com 

शरीरयष्टी खुपच किरकोळ आहे का ? मग वजन वाढविण्यासाठी करा ‘हे’ ८ उपाय
महिलांना दम्याचा आजार होण्याची शक्यता अधिक, जाणून घ्या कारण
‘डायबेटिस’ चा झोप आणि आहाराशी निकटचा संबंध, अशी घ्या काळजी
बाळाला फ्रूट ज्यूस देणे टाळा, जाणून घ्या कारणे
वाढत्या वजनावर कसे ठेवावे नियंत्रण ? आहार आणि व्यायामाबाबत जाणून घ्या
दाढ दुखत असल्यास करा ‘हा’ घरगुती उपाय, अशी घ्या काळजी
चॉकलेट खा… आणि हृदय ठेवा तंदुरुस्त, जाणून घ्या काय आहे यामध्ये
तुपापेक्षा तेल आहे घातक ! जाणून घ्या कारणे
अन्नाची चव वाढविणाऱ्या या मीठाचे आहेत अनेक फायदे, जाणून घ्या