‘जगावं की मरावं, या मानसिक स्थितीत मी, पंकजा अन् माझं रक्ताचं नात’, धनंजय मुंडेंना अश्रू अनावर (व्हिडीओ)

बीड : पोलीसनामा ऑनलाइन – परळी विधानसभा मतदारसंघामध्ये धनंजय मुंडे यांनी पंकजा मुंडे यांच्यावर केलेल्या विधानाची क्लिप मतदारसंघामध्ये व्हायरल होत आहे. यासंदर्भात परळी विधानसभा मतदारसंघातील राष्ट्रवादीचे उमेदवार धनंजय मुंडे यांनी माझ्या वक्तव्याचा विपर्यास करुन ही क्लिप बनविण्यात आल्याचे सागंतले. मी दोषी नसताना मला दोषी ठरवलं जातंय. माला असं वाटतंय की जग सोडून जावं, माझ्यासारख्या भावावरती एवढा अभद्र आरोप लावला जात असेल तर मला जीवनही नको, मलाही सख्या तीन बहिणी आहेत. मला चुलत सहा बहिणी आहे. मलाही तीन मुली आहेत, असे सांगताना धनंजय मुंडे यांना आश्रू अनावर झाले.

धनंजय मुंडे यांनी केज तालुक्यातील विंड्याच्या सभेत पंकजा मुंडे यांच्याबद्दल अपशब्द वापरल्याचा आरोप भाजपकडून करण्यात आला होता. त्यानंतर संतप्त भाजप कार्यकर्त्यांनी पोलीस स्थानकाला घेराव घालत घोषणाबाजी करून धनंजय मुंडे यांच्यावर गुन्हा दाखल करण्याची मागणी केली होती. यामुळे ऐन मतदानाच्या आगोदर राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे उमेदवार धनंजय मुंडे अडचणीत सापडले आहेत. याप्रकरणी धनंजय मुंडे यांनी पत्रकार परिषद घेऊन आपली बाजू मांडली. यावेळी नात्यावरील अर्वाच्य टीका-टीपण्णीमुळे भावनिक झाल्याचे पहायला मिळाले.
काय केली होती टीका ?

धनंजय मुंडेंनी पंकजा यांच्यावर टीका करताना, आमच्या दोघांमध्ये केवळ हाच फरक असल्याचे सांगत त्यांना टार्गेट केलं होतं. मी पंडित आण्णांच्या घरात जन्माला आलो आणि त्या गोपीनाथ मुंडेच्या घारात जन्माला आल्या. त्या मोठ्याच्या पोटी जन्माला आल्या, असे म्हणत धनंजय मुंडे यांनी पंकजा मुंडेंवर टीका केला हीते.

महिला आयोगाची नोटीस
सोशल मीडियावर धनंजय मुंडेंनी पंकजा यांच्याबद्दल आक्षेपार्ह विधान केल्याची व्हिडीओ क्लिप व्हायरल झाली आहे. या क्लिपनंतर धनंजय मुंडेंना महिला आयोगाकडून नोटीसही बजावण्यात येणार आहे. याप्रकरणी धनंजय मुंडे यांनी पत्रकार परिषद घेऊन आपली बाजू मांडली. यावेळी त्यांनी माझ्या बहिणीच्या बाबतीत मी कधीही कुठेही आक्षेपार्ह बोललो नाही. मी केवळ सरकार आणि मंत्र्यांवर टीका करण्याचा राजधर्म पाळत आलो. 17 तारखेचं माझं भाषण एडिट करून व्हायरल करण्यात आले असल्याचे त्यांनी सांगितले.

visit : Policenama.com