आमदार फुटू नयेत म्हणून शिवसेनेनं शिवसैनिकांना दिली ‘ही’ जबाबदारी

मुंबई : पोलीसनामा ऑनलाईन – शिवसेनेच्या नवनिर्वाचित आमदारांची बैठक पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांनी आजमुंबईत बोलविली आहे. आमदार फोडले जाण्याची भीती असल्याने या बैठकीनंतर सर्व आमदारांना एका पंचतारांकित हॉटेलमध्ये ठेवण्यात येणार आहे. शिवसेना आमदार फुटू नये यासाठी एका आमदारामागे एक विभागप्रमुख, शाखाप्रमुख यांना जबाबदारी देण्यात आलेली आहे. आमदारांना कोण भेटतं, कोणाचे फोन येतात, काय बोलणं होतं याकडे हे शिवसैनिक बारीक लक्ष ठेवणार आहेत.

राज्यात सध्या सत्ता स्थापनेवरून जोरादार हालचाली सुरू आहेत. एकीकडे भाजप नेते युतीचंच सरकार येईल, असा दावा करत असताना शिवसेनेकडून मात्र ठरल्याप्रमाणे झाल्याशिवाय चर्चा नाहीचा पवित्रा कायम आहे. मुंबईत आज भाजपकडून राज्यपालांकडे सत्ता स्थापनेचा दावा केला जाणार आहे. भाजपचे सुधीर मुनगंटीवार आणि चंद्रकांत पाटील हे राज्यपालांना भेटून सत्ता स्थापनेची माहिती देणार आहेत. तर शिवसेनेची मातोश्रीवर सर्व आमदारांची बैठक बोलावण्यात आली आहे.

शिवसेना-भाजपला पूर्ण बहुमत मिळालं आहे. भाजप 105 जागांसह सर्वात मोठा पक्ष ठरला आहे. तर शिवसेनेने 56 जागा जिंकल्या आहे. मात्र मुख्यमंत्री पदावरून भारतीय जनता पक्ष आणि शिवसेनेदरम्यान चर्चा न होता दोन्ही पक्षांमधील संबंध अधिक ताणले गेले. लोकसभा निवडणुकीच्या वेळी विधानसभेसाठी जो फॉर्म्युला ठरला होता, त्यानुसार अडीच-अडीच वर्ष मुख्यमंत्रीपदाची मागणी शिवसेना करत आहे. मात्र शिवसेनेची ही मागणी भाजपला मान्य नाही. तर शिवसेना खासदार संजय राऊत वारंवार मुख्यमंत्री शिवसेनेचाच होणार असे म्हणत आहेत.

Visit : Policenama.com

तुमच्या चुकीच्या जीवनशैलीमुळे सुद्धा होऊ शकतो ‘मायग्रेन’ चा त्रास
भेसळयुक्त ‘कुंकू’ वापरले तर होऊ शकतात ‘गंभीर’ परिणाम, जाणून घ्या
शरीरयष्टी किरकोळ असेल तर ‘हे’ 6 पदार्थ खा, दिसाल सेलिब्रिटींसारखे फिट
चेहऱ्याचे सौंदर्य खुलवण्यासाठी करा ‘हे’ 5 घरगुती आणि सोपे उपाय, जाणून घ्या
चुकीनही करू नका ‘यो यो डाएट’, बिघडू शकते तब्येत, जाणून घ्या
‘जंक फूड’ खाण्याची सवय सोडविण्यासाठी ‘हे’ 5 खास उपाय, जाणून घ्या
सावधान ! प्लॅस्टिकच्या बॉटलमधून पाणी पिताय ? जाणून घ्या धोके