‘चंपा’नंतर राज ठाकरेंचा ‘टरबूज’चा उल्लेख, मुख्यमंत्र्यांची उडवली खिल्ली

नाशिक : पोलीसनामा ऑनलाइन – निवडणुकीत चंपाची चंपी करणार असे म्हणत राज ठाकरे यांनी चंद्रकांत पाटील यांच्यावर पुण्यातील सभेत निशाणा साधला होता. तर आज नाशिक येथील सभेत टरबूज असा उल्लेख करत त्यांनी अप्रत्यक्षपणे मुख्यमंत्र्यांवर निशाणा साधला आहे. आजकाल काही पुरुषदेखील गर्भवती असल्यासारखं वाटतात, असे राज ठाकरे यांनी म्हटले. यावेळी राज ठाकरे यांनी कोणाचेही नाव घेतले नाही. मात्र, त्यांच्या विधानानंतर उपस्थितांमध्ये एकच हशा पिकला.

बाप दाखव नाहीतर श्राद्ध घाल
काश्मीरमधून हटवण्यात आलेल्या कलम 370 चा राज्यातील निवडणुकीशी काय संबंध असा प्रश्न उपस्थित करत राज ठाकरे यांनी सत्ताधाऱ्यांना राज्यातील प्रश्नांवर बोलण्याचे आव्हान दिले. शेतकरी मरतात, कामगार मरतात, युवकांना रोजगार नाही. तरी यांना काहीच वाटत नाही निवडणुकीत नुसती मजा सुरु आहे. पण मी असा राहू शकत नाही. कारण बाप दाखव नाही तर श्राद्ध घाल, हीच माझ्या कामाची पद्धत असल्याचे राज ठाकरे यांनी सांगितले.

नाशिकमधील पराभव जिव्हारी लागला
नाशिकमध्ये आम्ही जी पाच वर्षात कामं केली, ती अनेकांकडून २५ ते ३० वर्षात देखील झालेली नाहीत. मात्र, त्याच्यानंतरचा निवडणुकीतील जो पराभव होता, तो माझ्या जिव्हारी लागला. कारण, या शहरात मी व माझ्या सहकाऱ्यांनी मनापासून काम केलं होतं. त्यामुळे नाशिकमध्ये आम्ही जे कामं केलं ते आम्ही करायला पाहिजे होतं का नव्हत? असा प्रश्न देखील मला पडला असल्याचे राज ठाकरे यांनी सांगितले.

सेना-भाजप नेते ताट-वाट्या घेऊन फिरतायत
शिवसेना म्हणते आम्ही 10 रुपयात तुम्हाला जेवण देणार, तर ते नाय नाय म्हणतात, आम्ही 5 रुपयात देणार. जणू काय महाराष्ट्र भिकेलाच लागलाय, असे म्हणत राज ठाकरे यांनी शिवसेना-भाजप वर सडकून टीका केली. निवडणुकांचा हंगाम सुरु असून भाजप-शिवसेना ताट-वाट्या घेऊन फिरत असल्याचा टोला त्यांनी लगावला. तसेच भाजपसोबतच्या युतीमध्ये शिवसेना सडली असल्याची टीका देखील केली.

Visit : Policenama.com 

बाळाला फ्रूट ज्यूस देणे टाळा, जाणून घ्या कारणे
वाढत्या वजनावर कसे ठेवावे नियंत्रण ? आहार आणि व्यायामाबाबत जाणून घ्या
दाढ दुखत असल्यास करा ‘हा’ घरगुती उपाय, अशी घ्या काळजी
चॉकलेट खा… आणि हृदय ठेवा तंदुरुस्त, जाणून घ्या काय आहे यामध्ये
तुपापेक्षा तेल आहे घातक ! जाणून घ्या कारणे
अन्नाची चव वाढविणाऱ्या या मीठाचे आहेत अनेक फायदे, जाणून घ्या
शरीरयष्टी खुपच किरकोळ आहे का ? मग वजन वाढविण्यासाठी करा ‘हे’ ८ उपाय
महिलांना दम्याचा आजार होण्याची शक्यता अधिक, जाणून घ्या कारण
‘डायबेटिस’ चा झोप आणि आहाराशी निकटचा संबंध, अशी घ्या काळजी