कलम 370 शी महाराष्ट्राशी देणंघेणं नाही, असं म्हणणाऱ्यांना लाज वाटली पाहिजे, मोदींचा पवारांवर ‘निशाणा’

अकोला : पोलीसनामा ऑनलाईन – राज्य विधानसभा निवडणुकीचे मतदान अवघ्या पाच दिवसांवर येऊन ठेपल्यानं प्रचाराचा वेग वाढला आहे. युतीच्या उमरदवारांच्या प्रचारासाठी पंतप्रधान नरेंद्र मोदी आज महाराष्ट्रात आहेत. कलम 370 हटवल्याने देशातील जनता आनंदी आहे. मात्र या निर्णयामुळे काही जणांचा चेहरा उतरला आहे. कलम 370 चा महाराष्ट्राशी संबंध काय असे विचारणाऱ्यांनो डूब मरो असे विधान मोदी यांनी विरोधकांना उद्देशून केले आहे. अकोले येथील प्रचारसभेत ते बोलत होते.

कलम 370 वरून शरद पवारांसह विरोधी पक्षांवर टीका करताना नरेंद्र मोदी म्हणाले की , कलम 370 हटवल्याने देशातील जनता आनंदी आहे. मात्र या निर्णयामुळे काही जणांचा चेहरा उतरला आहे. त्यांना त्रास होत आहे. कलम 370 शी महाराष्ट्राशी देणंघेणं नाही, असं म्हणणाऱ्यांना लाज वाटली पाहिजे. आज संपूर्ण देश एक होऊन काश्मीरच्या मागे उभा आहे. देशाच्या रक्षणासाठी या शिवरांयांच्या भूमीतील मावळे हुतात्म्य पत्करत आहेत. आणि तुम्ही कलम 370 चा महाराष्ट्राशी काय संबंध म्हणून विचारणा करता. अशी मंडळी कलम 370 चा महाराष्ट्राशी काय संबध आहे, असा सवाल विचारत आहेत. कलम 370 चा महाराष्ट्राशी संबंध काय असे विचारणाऱ्यांनो डूब मरो. ‘

अकोले विधानसभा मतदार संघातून भाजपने माजी मंत्री मधुकर पिचड यांचे पुत्र वैभव पिचड यांना उमेदवारी दिली आहे. मागील निवडणुकीत वैभव पिचड राष्ट्रवादीकडून आमदार होते. त्यांच्याविरोधात राष्ट्रवादी काँग्रेसने डॉ.किरण लहामटे यांना उमेदवारी दिली आहे.

Visit : Policenama.com 

बाळाला फ्रूट ज्यूस देणे टाळा, जाणून घ्या कारणे
वाढत्या वजनावर कसे ठेवावे नियंत्रण ? आहार आणि व्यायामाबाबत जाणून घ्या
दाढ दुखत असल्यास करा ‘हा’ घरगुती उपाय, अशी घ्या काळजी
चॉकलेट खा… आणि हृदय ठेवा तंदुरुस्त, जाणून घ्या काय आहे यामध्ये
तुपापेक्षा तेल आहे घातक ! जाणून घ्या कारणे
अन्नाची चव वाढविणाऱ्या या मीठाचे आहेत अनेक फायदे, जाणून घ्या
शरीरयष्टी खुपच किरकोळ आहे का ? मग वजन वाढविण्यासाठी करा ‘हे’ ८ उपाय
महिलांना दम्याचा आजार होण्याची शक्यता अधिक, जाणून घ्या कारण
‘डायबेटिस’ चा झोप आणि आहाराशी निकटचा संबंध, अशी घ्या काळजी