आज माझ्या जीवनातील सर्वात वाईट दिवस, PM मोदींना गोपीनाथ मुंडेंचा विसर पडला

मुंबई : पोलीसनामा ऑनलाइन – राज्यातील विधानसभा निवडणूकीत प्रचारसभा रंगतदार होत चालल्या आहेत. पंतप्रधान मोदींनी आज बीड जिल्ह्यात प्रचारसभा घेतली. कलम 370 रद्द करणं हा राजनीतीचा निर्णय नसून देशहिताचा निर्णय असल्याचे पंतप्रधान मोदींनी यावेळी सांगितले. या निवडणूकीत रेकॉर्ड ब्रेक विजय मिळेल असा विश्वास देखील त्यांनी यावेळी व्यक्त केला. परंतू धनंजय मुंडे यांनी पंतप्रधान मोदींच्या या प्रचारसभेवर टीकास्त्र साधले. भाजपला गोपीनाथ मुंडेंचा विसर पडल्याचा आरोप धनंजय मुंडे यांनी केला.

धनंजय मुंडे यांनी टीका केली की दिवंगत लोकनेत्याचा अपमान कसा करायचा हे भाजपला चांगलेच जमते. आज मोदींच्या सभांसाठी छापलेल्या जाहिरातीत दिवंगत गोपीनाथ मुंडे यांचा साधा फोटोही नव्हता. मोदींनी गोपीनाथ गडाकडेही पाठ फिरवली. माझ्या जीवनातील हा सर्वात वाईट दिवस होता. दिवंगत लोकनेत्याचा अपमान कसा करायचा हे भाजपला चांगलेच जमते. आजचा दिवस माझ्या आयुष्यातील सर्वात वाईट दिवस आहे.

धनंजय मुंडे यापुढे म्हणाले की सर्व कार्यकर्ते आणि शरद पवार यांच्या संगनमताने पक्षाने नमिता मुंदडा यांना उमेदवारी देण्यात आली होती. परंतू उमेदवारी दिल्यानंतर देखील त्यांनी पक्षांतर केले, याला म्हणतात बेईमानी, या बेईमानीला केजच्या मातीत गाडा. या विधानसभा निवडणूकीत इमानदारी विरुद्ध बेईमानी अशी आहे.

Visit : Policenama.com 

बाळाला फ्रूट ज्यूस देणे टाळा, जाणून घ्या कारणे
वाढत्या वजनावर कसे ठेवावे नियंत्रण ? आहार आणि व्यायामाबाबत जाणून घ्या
दाढ दुखत असल्यास करा ‘हा’ घरगुती उपाय, अशी घ्या काळजी
चॉकलेट खा… आणि हृदय ठेवा तंदुरुस्त, जाणून घ्या काय आहे यामध्ये
तुपापेक्षा तेल आहे घातक ! जाणून घ्या कारणे
अन्नाची चव वाढविणाऱ्या या मीठाचे आहेत अनेक फायदे, जाणून घ्या
शरीरयष्टी खुपच किरकोळ आहे का ? मग वजन वाढविण्यासाठी करा ‘हे’ ८ उपाय
महिलांना दम्याचा आजार होण्याची शक्यता अधिक, जाणून घ्या कारण
‘डायबेटिस’ चा झोप आणि आहाराशी निकटचा संबंध, अशी घ्या काळजी