प्रत्यक्ष निकालात राष्ट्रवादी पहिल्या अथवा दुसऱ्या क्रमांकावर, राष्ट्रवादीच्या ‘या’ बडया नेत्याचा दावा (व्हिडिओ)

मुंबई : पोलिसनामा ऑनलाईन – महाराष्ट्रात मागील काही महिन्यापासून सुरु असलेला मतदानाचा धुरळा संपला असून अखेर काल राज्यात मतदान पार पडले. त्यानंतर विविध संस्थांच्या सर्वेनुसार राज्यात पुन्हा एकदा युतीचे सरकार येत असून आघाडीला मोठा धक्का बसला आहे. महायुतीला 200 च्या आसपास जागा मिळणार असून विरोधकांना केवळ 50 ते 60 जागा मिळणार असल्याचा अंदाज वर्तवण्यात आला आहे. मात्र आता यावर राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील यांनी टीका केली आहे.

या पोलमध्ये चुकीची माहिती दाखवली जात असून या विधानसभा निवडणुकांमध्ये राष्ट्रवादी काँग्रेस पहिल्या किंवा दुसऱ्या क्रमांकावर राहणार असल्याचा विश्वास त्यांनी व्यक्त केला आहे. तसेच जनतेने आघाडीच्या बाजूने कौल दिला असल्याचा विश्वास देखील त्यांनी व्यक्त केला आहे. या पोलमध्ये जाणूनबुजून एका पक्षाला वरचढ ठरवले जात असून ‘दाल में कुछ तो काला है’ असे वाटत असल्याचे देखील पाटील यांनी यावेळी म्हटले. त्यामुळे नागरिकांना या निवडणूक प्रक्रियेवर देखील शंका वाटू लागल्याचे पाटील यांनी म्हटले.

पुढे बोलताना ते म्हणाले कि, आज मोठ्या प्रमाणावर नागरिक या निवडणूक प्रक्रियेवर अविश्वास दाखवत आहेत. त्यामुळे त्यांच्या शंकांचे निरसन व्हायला हवे. दरम्यान, सर्व गोष्टी जमून आल्या तर राष्ट्रवादी काँग्रेस राज्यात पहिल्या किंवा दुसऱ्या क्रमांकाचा पक्ष म्हणून निवडून येणार असल्याचे देखील त्यांनी म्हटले. त्यामुळे आता उद्या नक्की काय घडणार हे पाहणे महत्वाचे ठरणार आहे.

Visit : Policenama.com

पोलीसनामा न्युज आता टेलीग्रामवर... आमचं चॅनेल (@policenamanews) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.
WhatsAPP
You might also like