सट्टा बाजार तेजीत, भाजप – शिवसेनेला मिळाला ‘एवढा’ भाव

मुंबई : पोलीसनामा ऑनलाइन – महाराष्ट्रात विधानसभा निवडणुकीची रणधुमाळी संपली असून आता सर्वांना उत्सुकता लागली आहे ती 24 ऑक्टोबरची. 24 ऑक्टोबरला राज्यातील सर्व चित्र स्पष्ट होणार आहे. दरम्यान, आज मतदान झाल्यानंतर एक्झिट पोल जाहीर झाले. या पोलनुसार राज्यात पुन्हा युतीचे सरकार येणार आहे. एक्झिट पोलनुसार युतीला 192-216 जागा मिळण्याची शक्यता वर्तवली आहे. यामध्ये सट्टाबाजार देखील मागे नाही. सट्टाबाजारानुसार युतीचे सरकार येणार असून युतीला 220 च्या पुढे जागा मिळतील असा अंदाज सट्टेबाजांनी वर्तवला आहे.

निवडणुकीत बंडखोरांमुळे भाजपला त्यांची मॅजिक फिगर 220 जागा गाठताना दमछाक होऊ शकते असा अंदाज सट्टेबाजांनी वर्तवला आहे. महाराष्ट्रासह हरयाणा मध्ये देखील विधानसभेच्या निवडणुकांसाठी आज मतदान झाले. या दोन्ही राज्यातील निवडणुकांवर 30 हजार कोटींचा सट्टा लागला आहेत. तर राज्यात महायुतीला 288 पैकी 210/215 जागा मिळण्याचा अंदाज वर्तवण्यात आला आहे. तर काँग्रेस-राष्ट्रवादीला 50-60 जागा मिळण्याचा अंदाज सट्टेबाजांनी वर्तवला आहे. तर एमआयएम आणि मनसेला एक किंवा दोन जागा मिळतील असा अंदाज आहे.

कोणत्या पक्षावर कितीचा सट्टा
भाजप – 120 जागांसाठी – 1 रु. 60 पैसे भाव
शिवसेना – 85 जागांसाठी – 3 रुपये भाव
काँग्रेस – 30 जागांसाठी – 2 रु. 50 पैसे भाव
राष्ट्रवादी काँग्रेस – 30 जागांसाठी – 3 रु. 50 पैसे भाव

Visit  :Policenama.com

पोलीसनामा न्युज आता टेलीग्रामवर... आमचं चॅनेल (@policenamanews) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.
W3Schools
You might also like