विधानसभा 2019 : पिंपरीत बोगस मतदान, पाच परप्रांतीय ताब्यात

पिंपरी-चिंचवड : पोलीसनामा ऑनलाईन – राज्यातील विधानसभेच्या 288 जागांसाठी मतदानाला सुरुवात झाली आहे. पिंपरी मतदारसंघातील पिंपरी गाव येथे पाच परप्रांतीयांनी बोगस मतदान केले असून पोलिसांनी त्यांना ताब्यात घेतले आहे.

विद्यानिकेतन शाळेतील बुथ क्रमांक 303 या मतदानकेंद्रात हा प्रकार घडला. मराठी मतदारांच्या नावावर परप्रांतीय मतदान करत असल्याची बाब शिवसेना नेत्यांच्या लक्षात आली. शिवसेनेचे आमदार गौतम चाबुकस्वार आणि त्यांच्या कार्यकर्त्यांनी या पाच जणांना पोलिसांच्या स्वाधीन केले. पिंपरी गावातील या मतदान केंद्रावर तणावाचे वातावरण आहे.

या परप्रांतीयांनी मराठी मतदारांच्या नावावर बोगस ओळखपत्र दाखवून मतदान केले आहे. शिवसेनेचे आमदार गौतम चाबुकस्वार आणि त्यांच्या कार्यकर्त्यांनी या पाच जणांना पोलिसांच्या स्वाधीन केले आहे. तसेच याबाबत आमदार गौतम चाबुकस्वार यांनी मतदान अधिकाऱ्यांकडे तक्रार केली आहे. पिंपरी पोलिसांनी या पाच जणांना ताब्यात घेतले आहे.

Visit  :Policenama.com

पोलीसनामा न्युज आता टेलीग्रामवर... आमचं चॅनेल (@policenamanews) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.
WhatsAPP
You might also like