सोशल मीडियावरही सत्ता ‘संघर्ष’ पेटला ! #MaharashtraWithShivsena ‘ट्रेंडिंग’मध्ये

मुंबई : पोलीसनामा ऑनलाइन – राज्यात सत्ता स्थापनेवरून वातावरण चांगलेच तापलेले असताना आता सोशल मीडियावर शिवसेनेच्या बाजूने एक मोठा ट्रेंड सुरु झाला आहे. #MaharashtraWithShivsena असा हॅशटॅग सध्या मोठ्या प्रमाणावर ट्विटरवर ट्रेंडिंगमध्ये आहे.

भाजपने सत्ता स्थापन करणार नसून विरोधात बसण्याचा निर्णय जाहीर केला होता आणि यासाठीचे खापर भाजपने शिवसेनेवर फोडले होते त्यानंतर सोशल मीडियावर मोठ्या प्रमाणावर शिवसेनेला ट्रोल करायला सुरुवात झाली होती. ट्विटरवर #ShivsenaCheatsMaharashtra असा हॅशटॅग ट्रेंड होऊ लागला होता काही तासांत 20 हजारावर ट्विट करण्यात आले होते. तसेच शिवसेना पक्ष प्रमुख उद्धव ठाकरे आणि युवासेना प्रमुख आदित्य ठाकरे यांचे मिम्स व्हायरल केले गेले होते.

बाळासाहेब ठाकरे यांचेच व्हिडीओ ट्रेंड करून शिवसेनेला ट्रोल करण्याचा प्रयत्न यावेळी मोठ्या प्रमाणावर करण्यात आला होता. मात्र या हॅशटॅगला विरोध करण्यासाठी #MaharashtraWithShivsena असा ट्रेंड सुरु झाला आहे. त्यामुळे सत्तास्थापनेचा संघर्ष राज्यात सुरु आहे तसा तो सोशल मीडियावरही सुरु असल्याचं पहायला मिळत आहे. या आधी देखील भाजप आणि शिवसेना यांच्या दरम्यान सोशल वॉर पहायला मिळाला होता.

शिवसेना राज्यात आणि सोशल मीडियावरही मोठ्या प्रमाणावर भाजपशी लढताना पहायला मिळत आहे. राज्यात जनतेने कोणत्याच पक्षाला बहुमत न दिल्याने कोणताही पक्ष स्वबळावर सत्ता स्थापन करू शकत नाही अशात शिवसेनेने भाजपला युतीसाठी साथ न दिल्याने भाजपने विरोधात बसण्याचा निर्णय जाहीर केला होता अशात आता काँग्रेस आणि राष्ट्रवादीच्या भूमिकेकडे अवघ्या महाराष्ट्राचे लक्ष लागून आहे.

Visit : Policenama.com 

 

Loading...
You might also like