राहुल कुल आणि मेघना बोर्डीकर यांची रासपमधून हाकालपट्टी : महादेव जानकर

मुंबई : पोलीसनामा ऑनलाइन – भाजप-शिवसेना महायुतीचा मित्र पक्ष असलेल्या रासपला जिंतूर आणि दौंड या दोन जागा सोडण्यात आल्या. मात्र, या जागावरील उमेदवारांना एबी फॉर्म देऊन कमळ चिन्हावर लढण्यास भाग पाडले आहे. त्यामुळे रासपचे महादेव जानकर हे नाराज झाले आहेत. भाजपकडून एबी फॉर्म घेतलेले राहुल कुल आणि मेघना बोर्डीकर यांची रासपमधून हाकालपट्टी केल्याची माहिती जानकर यांनी दिली आहे. तसेच मुख्यमंत्री, प्रदेशाध्यक्षांनी आश्वासन दिलं तरीही मला फसविले, भाजपने रासपशी गद्दारी केली अशी खंत जानकरांनी व्यक्त केली आहे.

महादेव जानकर म्हणाले, आता महायुतीमधून बाहेर पडणे योग्य राहणार नाही. त्यामुळे आम्ही महायुतीसोबत राहणार आहे. जिंतूर आणि दौंड बाबतचा निर्णय आता कार्यकर्ते घेतील. उद्धव ठाकरे यांनी म्हटले होते की, भाजपने मित्र पक्षांना जागा दाखवली ते योग्य आहे. सध्या शिवसेनाही गोत्यात आहे, मी पण भरडला जातोय, कुलने माझ्यासोबत गद्दारी केली. चांदा ते बांदा माझी कार्यकर्त्यांची फळी आहे. वेळ निघून गेली आहे. आता फक्त गंगाखेडी जागा रासप लढवणार आहे.

शिवसेना-भाजपने सहकार्य करावे
जिंतूर आणि दौंड येथील जागांवर भाजपने एबी फॉर्म दिला आहे. त्यामुळे गंगाखेड विधानसभा मतदारसंघातून रासप एकमेव जागा लढविणार आहे. उपेक्षित समाजाला न्याय मिळवून देणयासाठी आमचा पक्ष युतीसोबत राहणार आहे. गंगाखेड जागेसाठी शिवसेना-भाजपने सहकार्य करावे, मी इतर जागी त्यांचा प्रचार करण्यास तयार आहे. राहुल कुल आणि मेघना बोर्डीकर यांचा आता रासपशी काहीही संबंध नाही, रत्नाकर गुट्टे हा गंगाखेडमधून एकमेव अधिकृत रासपचे उमेदवार आहेत.

इकडे आड अन् तिकडे विहीर
भाजपने एबी फॉर्म दिल्याने रासपचे प्रमुख महादेव जानकर हे नाराज झाले आहेत. याबाबत बोलताना जनकर यांनी आपली अवस्था इकडे आड अन् तिकडे विहीर अशी झाली आहे. सबुरीने घ्याव लागणार आहे. उतवळपणा करून काय हाती येणार नाही अशी हतबलता जानकर यांनी व्यक्त केली आहे.

Visit : Policenama.com