शिवसेना हिंदुत्ववादावर ‘सॉफ्ट’ ?

मुंबई : पोलीसनामा ऑनलाइन – राज्यात राष्ट्रपती राजवट लागू झाल्यानंतर सत्तास्थापनेला शिवसेना, राष्ट्रवादी आणि काँग्रेस यांच्या सत्तावाटपावरुन जोरदार हालचाली सुरु झाल्या आहेत. शिवसेनेला पाठिंबा दिल्यानंतर राष्ट्रवादी आणि काँग्रेस आता सकारात्मक असल्याचे दिसत आहे. या तिन्ही पक्षात आज मुंबई ट्रायडंट हॉटेलवर चर्चा सुरु होती. ही बैठक देखील पार पडली आहे. ही वाटाघाटी सुरु असताना आता राजकीय वर्तुळात आणि जनमानसात चर्चा सुरु झाली आहे की शिवसेना हिंदुत्वाच्या मुद्यावर काय करणार, या संबंधित अनेक तर्कवितर्क देखील लढवले जात आहेत. या मुद्द्यावर बोलताना लीलावतीत उपचार घेत असलेले शिवसेना नेते संजय राऊत यांनी आपल्या शैलीत उत्तर दिले.

काँग्रेस राष्ट्रवादीसोबत जाताना हिंदुत्व आड येणार नाही का ? असे विचारल्यावर संजय राऊत म्हणाले की आम्ही काय धर्मांतर केलं आहे का ? सगळेच हिंदू आहेत. शरद पवार हिंदू आहेत, अशोक चव्हाण हिंदू आहेत. प्रत्येक पक्षाच्या विचारधारेत थोडेफार मतभेद असतोच. प्रत्येक गोष्ट पटतेच असे नाही. भाजपाची आणि आमची विचारधारा एक होती, पण वेगळे झालोच ना? त्यातून शिवसेनेची काँग्रेस-राष्ट्रवादीसोबत जाण्याची मानसिक तयारी असल्याचे स्पष्ट दिसत आहे, पण येत्या काळात ते सॉफ्ट हिंदुत्ववादाची कास धरु शकतात, असे संकेत मिळत आहेत.

संजय राऊत म्हणाले की कुणाबरोबर जातो या पेक्षा शिवसेनेचा मुख्यमंत्री होणं महत्वाचं आहे. भाजपने शब्द पाळला नाही. महाराष्ट्रात दिलेला शब्द फार किंमती असतो. अयोध्येत राम मंदिर बांधतोय तर सत्यवचनी रामाचा विचारही घ्या असा टोला देखील संजय राऊतांनी भाजपला मारला. आमच्याकडे 170 आमदार असल्याचा दावा करताना संजय राऊत म्हणाले की आमच्याकडे 170 आमदार आहेत आणि ते कसे येणार हे शरद पवारांना माहिती आहे. राज्यपालंनी राष्ट्रपती राजवट लागू करुन सर्व पक्षांवर अन्याय केला, आमचा मुख्यमंत्री होईल आणि 15 दिवसांत असमर्थता दर्शवणाऱ्या भाजपचा कान राज्यपालांनी धरायला हवा होता अशी टीका देखील राऊतांनी केली.

छातीत दुखत असल्याने संजय राऊत हे सोवारी लीलावती रुग्णालयात दाखल झाले होते. त्यांच्या रक्तवाहिन्यांमध्ये दोन ब्लॉक होते. आज लीलवती रुग्णालयातून त्यांनी डिस्चार्ज मिळेल.

Visit : Policenama.com