शरद पवार आणि उद्धव ठाकरेंची उद्या ‘भेट’, ‘हा’ निर्णय ‘फायनल’ होणार

मुंबई : पोलीसनामा ऑनलाइन – राष्ट्रवादीचे अध्यक्ष शरद पवार आणि शिवसेना पक्ष प्रमुख उद्धव ठाकरे यांची उद्या (शुक्रवार, दि. 22 ) मुंबईत भेट होणार आहे. यात सत्ता स्थापनेचा अंतिम निर्णय होणार आहे अशी माहिती सूत्रांनी दिली आहे.

उद्याच्या बैठकीत 27 तारखेला शपथविधी घ्यावा अशी मागणी होत आहे. परंतु बैठक झाल्यानंतरच याबाबत अंतिम निर्णय होणार आहे. यानंतर सोमवारी राज्यपालांची भेट घेतल्यानंतर सत्ता स्थापनेचा दावा केला जाणार असल्याची शक्यता आहे.

दरम्यान 24 तारखेनंतरच महाविकासआघाडीला सत्तास्थापनेचा दावा करता येणार आहे. कारण 22 आणि 23 नोव्हेंबर रोजी राज्यपाल भगत सिंह कोश्यारी दिल्लीत असणार आहेत. दिल्लीतील राष्ट्रपती भवनात दोन्ही दिवशी कॉन्फरन्ससाठी ते हजर राहतील. दिल्ली दौरा आटोपल्यानंतर 24 तारखेला सायंकाळी ते मुंबईला परत येतील अशी माहिती राजभवनाकडून देण्यात आली आहे.

राज्यात सुरू असलेल्या सत्ता कोंडीबाबत गेल्या आठवड्याभरापासून दिल्लीत बैठका सुरू आहेत. यानंतर अखेर काँग्रेस आणि राष्ट्रवादीच्या बैठकांनंतर स्थिर सरकार स्थापन करण्यासाठी निर्णय घेण्यात आला आहे. यानंतर आता मुंबईत बैठक पार पडेल आणि सत्ता स्थापनेचा निर्णय होईल.

Visit : Policenama.com 

 

पोलीसनामा न्युज आता टेलीग्रामवर... आमचं चॅनेल (@policenamanews) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.
WhatsAPP
You might also like