शरद पवार प्रचंड ‘जातीयवादी’, चंद्रकांत पाटलांचा गंभीर आरोप

मुंबई : पोलीसनामा ऑनलाइन – संभाजीराजेंनी भाजपमध्ये प्रवेश केल्यानंतर राज्यसभेवर खासदार म्हणून त्यांची निवड झाली. त्यावेळी शरद पवार यांनी संभाजीराजे पेशव्यांसोबत गेले असे म्हटल्याचे सांगत चंद्रकांत पाटील यांनी शरद पवार हे जातीयवादी असल्याचा थेट आरोप केला आहे. भाजपचे सर्व नेते, विशेष म्हणजे पंतप्रधान नरेंद्र मोदींनीही संभाजीराजेंचं उभे राहून अभिनंदन केले होते. पण पवारांकडून नेहमीच जातीयवाद केला जातो, ते प्रचंड जातीयवादी असल्याचे पाटील यांनी म्हटले आहे.

पुण्याचे पालकमंत्री आणि कोथरुड विधानसभा मतदारसंघाचे भाजपचे उमेदवार चंद्रकांत पाटील यांनी एका वृत्तवाहिनीला दिलेल्या मुलाखतीमध्ये शरद पवार यांच्यावर जातीयवादाचा आरोप केला. आरोप करताना त्यांनी शरद पवार यांच्या नेतृत्वाचे कौतुक देखील केले. जातीयवादाचा आरोप करताना त्यांनी शरद पवार यांचे हातवारे केले हे अतिच होत आहे. यापूर्वी त्यांनी उखडलंय का ? असे म्हटले होते. शरद पवार यांच्यासारख्या ज्येष्ठ नेत्याला शोभत नसल्याचेही त्यांनी सांगितले.

चंद्रकांत पाटील यांना ‘चंपा’ या अजित पवारांच्या विधानाविषयी विचारले असता, ज्याच्या त्याच्या संस्काराच भाग असल्याचे सांगून अजित पवारांना मी याबाबत काहीही बोलणार नाही. पण राज ठाकरेंनी नवे नाव शोधायला पाहिजे होते. राज हे अतिहुशार आणि क्रिएटीव्ह व्यक्ती आहेत. राज ठाकरे यांचे राज्यात नेतृत्व चांगले असून मी त्यांना कॉलेजपासून ओळखतो. ते माझे चांगले मित्र आहे. पण ते मला मित्र समजतात की नाही हे मला माहित नाही असे चंद्रकांत पाटील यांनी म्हटले.

Visit : Policenama.com 

बाळाला फ्रूट ज्यूस देणे टाळा, जाणून घ्या कारणे
वाढत्या वजनावर कसे ठेवावे नियंत्रण ? आहार आणि व्यायामाबाबत जाणून घ्या
दाढ दुखत असल्यास करा ‘हा’ घरगुती उपाय, अशी घ्या काळजी
चॉकलेट खा… आणि हृदय ठेवा तंदुरुस्त, जाणून घ्या काय आहे यामध्ये
तुपापेक्षा तेल आहे घातक ! जाणून घ्या कारणे
अन्नाची चव वाढविणाऱ्या या मीठाचे आहेत अनेक फायदे, जाणून घ्या
शरीरयष्टी खुपच किरकोळ आहे का ? मग वजन वाढविण्यासाठी करा ‘हे’ ८ उपाय
महिलांना दम्याचा आजार होण्याची शक्यता अधिक, जाणून घ्या कारण
‘डायबेटिस’ चा झोप आणि आहाराशी निकटचा संबंध, अशी घ्या काळजी