नारायण राणेंचा उध्दव ठाकरेंवर ‘प्रहार’, 10 रूपयांत थाळी कोठून देणार ?

सिंधुदुर्ग : पोलीसनामा ऑनलाइन – विधानसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर पुन्हा एकदा नारायण राणे विरुद्ध शिवसेना असा सामना रंगताना पहायला मिळत आहे. शिवेसनेने 10 रुपयात सकस जेवण देण्याचे आश्वासन शिवसेना पक्षप्रमुख शिवसेनायांनी दिले आहे. याच वक्तव्यावरून नारायण राणे यांनी शिवसेनेला लक्ष केलं आहे. उद्धव ठाकरे वचनामा पूर्ण कुठून करणार याचं बजेट कुठून आणणार ? 10 रुपयात थाळी देणार त्यामध्ये होणारे नुकसान कोण भरून देणार ? उद्धव ठाकरे शेतकऱ्यांचा सातबारा उतारा कोरा करुन देतो म्हणाले, त्यांना सातबारा तरी माहित आहे का ? अशा शब्दात नारायण राणे यांनी शिवसेनेवर प्रहार केला आहे.

शिवसेना उमेदवाराची दखल घेत नाही
शिवसेनेच्या वचननाम्यावर सडकून टीका करताना सिंधुदुर्ग जिल्ह्यात भाजपचे तिन्ही उमेदवार निवडून येणार असल्याचा दावा राणे यांनी केला आहे. कणकवलीमधून शिवसेनेने उमेदवार उभा केलाय त्याची दखल घेत नाही, काम करणारे आमदार म्हणून नितेश राणे प्रसिद्ध आहेत, कुडाळच्या आमदाराचे नाव तरी आहे का ? जनतेला विकास आणि नोकऱ्या पाहिजेत त्यामुळे जिल्ह्यातील जनता भाजपच्या पाठिशी असल्याचे नारायण राणे यांनी सांगितले.

सुभाष देसाईंनी शिवसेनेत भांडण लावलं
मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस सिंधुदुर्ग जिल्ह्यात प्रचारासाठी येणार नसल्याच्या पुड्या सोडल्या जात असल्याचे विधान सुभाष देसाई यांनी केले आहे. त्यांच्या वक्तव्याचा समाचार घेताना राणे म्हणाले, सुभाष देसाई यांना शिवसेनेत किती महत्त्व आहे हे माहित आहे, शिवसेनत भांडणं लावयाचं काम सुभाष देसाई यांनी केले. मुख्यमंत्री सिंधुदुर्गमध्ये प्रचारासाठी येणार हे ठरलं आहे. तसं मुख्यमंत्र्यांनी पत्रकार परिषदेत जाहीर केले आहे असा टोला नारायण राणे यांनी सुभाष देसाईंना लगावला.

Visit : Policenama.com