शिवसेनेचा विजय PM मोदींच्या नावावर, आगामी काळात मुंबईचा महापौर भाजपचाच

कणकवली : पोलिसनामा ऑनलाईन – विधानसभा निवडणुकीचा प्रचार सध्या जोरात सुरु असून सर्वच पक्षांनी प्रचारात आघाडी घेतली असून अनेक ठिकाणी काही उमेदवारांनी बंडखोरी केली आहे. या बंडखोरीमुळे शिवसेना आणि भाजपमध्ये पुन्हा एकदा वाद उफाळून आला असून सिंधुदुर्गमधील कणकवली मतदारसंघात भाजपचे नितेश राणे यांच्याविरोधात शिवसेनेने उमेदवार उभा केल्याने राणे आणि शिवसेना असा वाद पुन्हा उभा राहिला आहे.

यावरून नितेश राणे यांनी शिवसेनेवर कडक शब्दांत टीका केली असून मोदींच्या नावावरच शिवसेनेचे उमेदवार विजयी होतात, त्यामुळे शिवसेनेने युती धर्म पाळावा अशी टीका नितेश राणे यांनी केली आहे. याविषयी अधिक बोलताना नितेश राणे म्हणाले कि, संपूर्ण कोकणमध्ये एकच जागा भाजपने शिवसेनेकडे मागितली असून त्याठिकाणी देखील बंडखोरी केली आहे. त्यामुळे राणेंना शिव्या देणे हाच केवळ शिवसेनेचा अजेंडा आहे, शिवसेनेवर टीका करू नका असे मुख्यमंत्र्यांनी सांगितल्याने आम्ही शांत असल्याचे देखील त्यांनी यावेळी म्हटले.

या सर्व गोष्टींची नोंद घेतली जात असते, त्यामुळे आगामी काळात पक्षश्रेष्ठी यासंदर्भातील निर्णय घेतील, असेदेखील त्यांनी सांगितले. भविष्यात मुंबईचा महापौर भाजपाचाच असेल असाही इशारा नितेश राणेंनी शिवसेनेला दिला आहे. त्यामुळे आता नितेश राणे त्यांच्यावतीने झालेल्या या टीकेनंतर शिवसेना काय प्रतिक्रिया देते हे पाहणे महत्वाचे ठरणार आहे.

दरम्यान, भाऊ निलेश राणे यांच्याशी असलेल्या मतभेदावर बोलताना ते म्हणाले कि, आम्ही रक्ताचे भाऊ असलो तरी काही मतभेद असतातच. आम्ही एकमेकांचा आदर ठेवून आपली मते मांडत असतो. आमचं नातं हे मैत्रीचं आहे. मात्र वडिलांना ज्यांनी त्रास दिला त्याचा राग माझ्याही मनात आहे. त्यामुळे आमच्याविषयी गैरसमज पसरवण्याचे काम कुणीही करू नये. त्याचबरोबर 2024 पर्यंत भाजपला आम्ही संपूर्ण कोकणात वाढवणार असल्याचे मत देखील त्यांनी व्यक्त केले.

Visit : Policenama.com 

बाळाला फ्रूट ज्यूस देणे टाळा, जाणून घ्या कारणे
वाढत्या वजनावर कसे ठेवावे नियंत्रण ? आहार आणि व्यायामाबाबत जाणून घ्या
दाढ दुखत असल्यास करा ‘हा’ घरगुती उपाय, अशी घ्या काळजी
चॉकलेट खा…आणि हृदय ठेवा तंदुरुस्त, जाणून घ्या काय आहे यामध्ये
तुपापेक्षा तेल आहे घातक ! जाणून घ्या कारणे
अन्नाची चव वाढविणाऱ्या या मीठाचे आहेत अनेक फायदे, जाणून घ्या
शरीरयष्टी खुपच किरकोळ आहे का ? मग वजन वाढविण्यासाठी करा ‘हे’ ८ उपाय
महिलांना दम्याचा आजार होण्याची शक्यता अधिक, जाणून घ्या कारण
‘डायबेटिस’ चा झोप आणि आहाराशी निकटचा संबंध,अशी घ्या काळजी