‘त्या’ नेत्याला उद्धव ठाकरेंकडून बिभीषणाची उपमा ?

मुंबई : पोलीसनामा ऑनलाइन – शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांनी ‘सामना’चे कार्यकारी संपादक संजय राऊत यांना दिलेल्या मुलाखतीचा दुसरा भाग आज प्रसारित झाला. यावेळी राऊत यांनी महाराष्ट्राच्या राजकारणासह शिवसेनेची युती करण्यामागची भूमिका, राम मंदिराचा प्रश्न, आदित्य ठाकरेंचा राजकीय प्रवेश, नेत्यांचे पक्षांतर यासंदर्भात प्रश्न केले.

राज्यातील राजकारणात गेल्या पाच वर्षांमध्ये विरोधी पक्ष नेत्याची भूमिका शिवसेनेनंच वठवली, उद्धव ठाकरेंच्या या विधानावर राऊत यांनी प्रतिप्रश्न केला की, त्यावेळी जो विरोधी पक्षनेता, त्याचं काय झालं, यावर उत्तर देताना उद्धव ठाकरे म्हणाले की हे लोकशाहीतलं युद्ध आहे. त्याच्यामध्ये त्याही वेळेला ते बिभीषण विभीषण तिथले इथे, इथले तिथे आलेच होते. ते आता याबाबतीत येताहेत.

महाराष्ट्राच्या हितासाठी युती केली
विधानसभा निवडणुकीत युती करताना कमी जागा घेऊन शिवसेनेला छोट्या भावाची भूमिका घ्यावी लागली आहे. त्यावरून चर्चा सुरु आहे. यावर बोलताना उद्धव ठाकरे म्हणाले की , ‘महाराष्ट्राच्या हितासाठी मी युती केलीय. भाजपला समजून घेतलेय. महाराष्ट्राला हे माहीत आहे. महाराष्ट्र हा काही धृतराष्ट्र नाही. मी युतीसाठी तडजोड केली. पण ती महाराष्ट्राच्या हितासाठी केली. मी एकटा कधीही लढू शकतो. 124 जागा ही तडजोड नाही. देवेंद्र फडणवीस, चंद्रकांत पाटील म्हणत होते की, आमची अडचण उद्धवजींनी समजून घ्यावी. ती मी समजून घेतली.

Visit : Policenama.com