‘या’ कारणामुळे पंकजा मुंडेंना भोवळ आली, आता प्रकृती स्थिर, डॉक्टरांनी सांगितलं

परळी : पोलीसनामा ऑनलाइन – विधानसभा निवडणुकीच्या शेवटच्या दिवशी प्रचाराचा धुरळा उडवत नेत्यांनी आपल्या मतदारसंघात जोरदार प्रचार केला. परळी येथे प्रचारसभेत भावुक भाषण केल्यानंतर भाजपचे उमेदवार पंकजा मुंडे या स्टेजवर भोवळ आल्याने त्या खाली बसल्या. त्यामुळे उपस्थित नेत्यांनी आणि कार्यकर्त्यांनी त्यांच्याकडे धाव घेत त्यांना तात्काळ रुग्णालयात उपचारासाठी दाखल केले. त्यांची प्रकृती आता स्थिर असल्याचे डॉ. वांगे यांनी सांगितले. शनिवारी सायंकाळी सहाच्या सुमारास हा प्रकार घडला.

पंकजा मुंडे निवडणूक प्रचाराच्या समारोपाचे भाषण करत असताना त्यांना भोवळ आली. यावेळी त्यांच्या समवेत त्यांचे पती अमित पालवे हे देखील उपस्थित होते. दरम्यान, शनिवारी हेलीकॉप्टरने सकाळी जिंतूर, कणेरवाडी, पाटोदा, परळी अशा चार ठिकाणी सभा घेतल्या. परळीची चौथी सभा होती. आपल्या निवडणूक प्रचाराची समारोपाची सभा संपली आणि पंकजा मुंडे व्यासपीठावरून खाली उतरत असताना अचानक अस्वस्थ झाल्या आणि त्यांना स्टेजवरच चक्कर आली. त्यांना तात्काळ रुग्णालयात दाखल करण्यात आले.

परळीत पंकजा मुंडे यांनी जवळपास 45 मिनिटे संबोधित केले. आपल्या भाषणात त्यांनी राजकीय भाषणापेक्षा आपल्या मनातील सर्व सलणाऱ्या प्रचारात आप्तेष्टांकडूनच आलेले आरोप, त्यामुळे झालेल्या यातना या गोष्टी भाषणात मांडताना त्यांना गहिवरून आले होते. आपल्या संपूर्ण भाषणात भावना व्यक्त करताना प्रचंड भावूक झाल्या होत्या.

सकाळपासून विविध ठिकाणी प्रचार सभा घेऊन परळीत आल्यानंतर त्यांना थकवा आला होता. रात्री उशिरापर्यंतचे दररोज जागरण, दगदग होत होती. आजही त्यांना अतिश्रमाने खूप घाम आला होता. डीहायड्रेशन झाले होते. यात भावना उचंबळून आल्याने हा प्रकार घडल्याचे डॉ. वांगे यांनी सांगितले.

Visit : Policenama.com 

शरीरयष्टी खुपच किरकोळ आहे का ? मग वजन वाढविण्यासाठी करा ‘हे’ ८ उपाय
महिलांना दम्याचा आजार होण्याची शक्यता अधिक, जाणून घ्या कारण
‘डायबेटिस’ चा झोप आणि आहाराशी निकटचा संबंध, अशी घ्या काळजी
बाळाला फ्रूट ज्यूस देणे टाळा, जाणून घ्या कारणे
वाढत्या वजनावर कसे ठेवावे नियंत्रण ? आहार आणि व्यायामाबाबत जाणून घ्या
दाढ दुखत असल्यास करा ‘हा’ घरगुती उपाय, अशी घ्या काळजी
चॉकलेट खा… आणि हृदय ठेवा तंदुरुस्त, जाणून घ्या काय आहे यामध्ये
तुपापेक्षा तेल आहे घातक ! जाणून घ्या कारणे
अन्नाची चव वाढविणाऱ्या या मीठाचे आहेत अनेक फायदे, जाणून घ्या

पोलीसनामा न्युज आता टेलीग्रामवर... आमचं चॅनेल (@policenamanews) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.
WhatsAPP
You might also like